Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’

Little Tukaram Mundhe Goes Viral: महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाची चर्चा आता नवरात्रीच्या गरबा मैदानापर्यंत पोहोचली आहे. फॅन्सी ड्रेस गरबा स्पर्धेत लहान मुलं त्यांच्यासारखा वेश परिधान करून सहभागी होत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 19, 2026 | 04:06 PM
Little Tukaram Mundhe Goes Viral (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Little Tukaram Mundhe Goes Viral (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीच्या फॅन्सी ड्रेस गरबा स्पर्धेत मुलांनी तुकाराम मुंढे यांचा वेश परिधान केला.
  • एका मुलाचा फॉर्मल कपडे, चष्मा, मिशी आणि फाईलसह असलेला लूक लक्षवेधी ठरला.
  • मुलाच्या पाटीवर ‘मी छोटा तुकाराम मुंढे आहे’ असे लिहिले होते.
सध्या महाराष्ट्रात एका अधिकाऱ्याचं नाव खूप गाजत आहे, ते म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी राज्यात ज्या पद्धतीने भेसळीवर कारवाया केल्या आहेत, त्यामुळे ते सगळीकडे चर्चेत आहेत. जिथे नियम तोडले जात आहेत तिथे थेट जाऊन कारवाई करणे, दुकानं सील करणे, लोकांच्या आरोग्यासाठी कडक भूमिका घेणे, हे त्यांचं काम लोकांना खूप आवडत आहे. Little Tukaram Mundhe Goes Viral:

पण आता त्यांची ही चर्चा फक्त ऑफिसपुरती किंवा बातम्यांपुरती राहिली नाही. त्यांची क्रेझ थेट नवरात्रीच्या गरब्याच्या मैदानात पोहोचली आहे. यंदाच्या नवरात्रीत फॅन्सी ड्रेस गरबा स्पर्धेत लहान लहान मुलं तुकाराम मुंढे बनून येत आहेत आणि त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गरब्यात दिसला छोटा तुकाराम मुंढे

व्हिडीओत काय दिसतं तर एक छोटा मुलगा एकदम मुंढे साहेबांसारखा तयार झाला आहे. अंगात फॉर्मल शर्ट-पँट, नाकाखाली छोटी मिशी, डोळ्यावर चष्मा, गळ्यात आयडी कार्ड आणि हातात एक फाईल. एका मुलाच्या हातात तर एक पाटी पण आहे, त्यावर लिहिलं आहे “मी छोटा तुकाराम मुंढे आहे” आणि खाली एक वाक्य लिहिलं आहे “Honesty is the best policy” म्हणजे प्रामाणिकपणा हाच खरा दागिना आहे.

अशा वेशात ही मुलं जेव्हा गरब्याच्या स्टेजवर येतात तेव्हा लोक टाळ्या, शिट्ट्या वाजवून त्यांचं स्वागत करतात. लहान मुलं असा विचार करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. सहसा मुलं जेठालाल, सिंघम, झाशीची राणी असे काहीतरी बनतात, पण यावेळी एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा लूक घेऊन येणं हे खरंच वेगळं आहे.

लोकांना मुंढे साहेब का आवडतात?

सरकारी अधिकारी म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर भ्रष्टाचार येतो. पण तुकाराम मुंढे यांचं नाव याला अपवाद आहे. ते त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. आजपर्यंत त्यांच्या अनेकदा बदल्या झाल्या, पण ते ज्या ठिकाणी गेले तिथे त्यांनी आपल्या कामाने छाप सोडली.

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या

नियमात कोणतीही तडजोड नाही, कामात पारदर्शकता आणि लोकांच्या हिताला पहिलं प्राधान्य, यामुळे सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. म्हणूनच जेव्हा लहान मुलं त्यांचा अवतार घेतात तेव्हा लोकांना ते खूप भारी वाटतं. 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया?

या व्हिडीओवर लोक खूप भारी कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, sahnavaidya म्हणतो की “शेवटी लोकांनी योग्य माणसाला आदर्श मानायला सुरुवात केली आहे.”

दुसरी युजर pranita_thakur26 म्हणते की “बाळा खूप छान केलंस, तुकाराम सर लवकरच तुला भेटायला येतील.” तर nehasalviofficial ने गंमतीत लिहिलं आहे की “मुंढे साहेब लवकरच तुझ्या आईच्या किचनला भेट देतील” कारण सध्या ते घरातल्या भेसळीवर पण लक्ष देत आहेत.

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’

अनेकांनी हसण्याचे इमोजी टाकून या मुलांचं कौतुक केलं आहे. खरंच, अशा छोट्या गोष्टींमधूनच आपण मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवू शकतो. एखाद्या हिरोचा नाही तर एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा आदर्श घेणं, हीच खरी नवरात्रीची शिकवण आहे असं म्हणायला हरकत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गरबा स्पर्धेत मुलांनी कोणाचा वेश केला?

    Ans: तुकाराम मुंढे यांचा

  • Que: मुलाचा लूक कसा होता?

    Ans: फॉर्मल कपडे, चष्मा, छोटी मिशी, आयडी कार्ड आणि हातात फाईल.

  • Que: मुलाच्या पाटीवर काय लिहिले होते?

    Ans: ‘मी छोटा तुकाराम मुंढे आहे’ आणि ‘Honesty is the best policy’.

Web Title: Little tukaram mundhe viral navratri garba fancy dress video rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Navratri 2026
  • Tukaram Mundhe
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या
1

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’
2

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’

Skill Development Centres : नवरात्रीनिमित्त पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईतील तरुणांशी साधला संवाद , ‘अंबे माता चौक’चे उद्घाटन केले
3

Skill Development Centres : नवरात्रीनिमित्त पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईतील तरुणांशी साधला संवाद , ‘अंबे माता चौक’चे उद्घाटन केले

Buldhana News: तब्बल १६५० अखंड नंदादीपांच्या प्रकाशाने सवचे जगदंबा मंदिर उजळून निघाले
4

Buldhana News: तब्बल १६५० अखंड नंदादीपांच्या प्रकाशाने सवचे जगदंबा मंदिर उजळून निघाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.