Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केदारनाथ मंदिरासमोर तरुणीने बॉयफ्रेंडला केलं प्रपोज, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांचा संताप

केदारनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार तिवारी यांनी म्हटलं की, केदारनाथमध्ये बीकेटीसीला मंदिर परिसरात मोबाईलवर बंदी घालण्याची गरज आहे. भाविकांमधून अशा घटनांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • By साधना
Updated On: Jul 04, 2023 | 06:21 PM
propose in front of kedarnath

propose in front of kedarnath

Follow Us
Close
Follow Us:

केदारनाथ धाम यात्रेला (Kedarnath Yatra) गेलेल्या एका तरुणीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यामध्ये मुलीने केदारनाथ मंदिरासमोरच आपल्या प्रियकराला लग्नाची मागणी घातली आहे. पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या या तरुणीने मंदिराच्या आवारातच गुडघ्यावर बसून केदारनाथ (Kedarnath) मंदिरासमोरच बॉयफ्रेंडला प्रपोज केलं. तिच्या प्रियकरानेही यावेळी पिवळा कुर्ता परिधान केला होता.

धार्मिक स्थळावर केलेल्या या प्रकारावर अनेकांनी टीका केली आहे. धार्मिक स्थळांवर होत असलेल्या अशा प्रकारांमुळे नेटकरी संतापले आहेत. मंदिराच्या आवारात असं काही करणं चुकीचं असल्याचं काहींचं म्हणणं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. तो व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यावर टीकेची झोड सुरू झाली. लोकांनी धार्मिक भावनेला धक्का पोहोचवल्याचा आरोप केला आहे. तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये काहीजण म्हणतात की, ही मुलीची चूक नाही, अशा ठिकाणी फोन आणण्यासच मनाई केली पाहिजे. तरुणांनी अशी कृत्य करताना एकदा विचार करायला हवा, असं काहींचं म्हणणं आहे.

मंदिराच्या आवारात अशी कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून अनेकांनी या घटनेवर टीका केली आहे. अनेक सोशल मीडिया व्लॉगर आणि रील बनवणारे लोक धार्मिक संस्कृतीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

केदारनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार तिवारी यांनी म्हटलं की, केदारनाथमध्ये बीकेटीसीला मंदिर परिसरात मोबाईलवर बंदी घालण्याची गरज आहे. भाविकांमधून अशा घटनांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव विशाखा आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर (@ridergirlvishakha) ही रील शेअर केली आहे. ज्यामध्ये सर्व काही प्लॅननुसार घडल्याचंही ती सांगते. मॅचिंग कपडे, अंगठीचा आकार आणि प्रवासाचा प्लॅन असं सर्व परफेक्ट होतं, असं ती म्हणते. भोलेनाथांच्या आशीर्वादाने माझं स्वप्न पूर्ण झाल्याचंही ती म्हणाली.

अवघ्या 36 सेकंदाच्या या क्लिपमध्ये पिवळे कपडे परिधान केलेलं कपल मंदिराच्या आवारात भोलेनाथाला प्रार्थना करताना दिसत आहेत. तेव्हाच ती मुलगी तिचा एक हात मागे घेते आणि ठरल्याप्रमाणे कोणीतरी तिच्या हातात एक छोटा अंगठीचा बॉक्स ठेवतं, ज्यानंतर ती फिल्मी स्टाईलमध्ये गुडघ्यावर बसते आणि प्रियकराला प्रपोज करते. मुलाचे डोळे उघडल्यावर हे चित्र पाहून त्याला धक्का बसतो, ती मुलाला अंगठी घालते आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात.

Web Title: Woman proposed boy friend in front of kedarnath temple nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2023 | 06:18 PM

Topics:  

  • Kedarnath
  • Uttarakhand
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.