वर्क फ्रॉम थिएटर! ‘धुरंधर 2’ सुरू असताना लॅपटॉपवर काम करताना दिसली महिला; नेटकरी म्हणाले, 'कॉर्पोरेट मजदूर...', VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, थिएटरमधील दृश्य दिसत आहे. यामध्ये एक महिला चित्रपट सुरु असताना आपल्या सीटनर बसून लॅपटॉपवर टायपिंग करत आहे. समोर मोठ्या स्क्रीनवर धुरंधर मूव्ही सुरु आहे. अशा वेळी महिला मनोरंजन आणि काम दोन्ही गोष्टी करत आहे. हा व्हिडिओ थिएटरमधीलच एका प्रेक्षकाने शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
यावर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटले आहे की, ताई मी तुझं दु:ख समजू शकतो, तर दुसऱ्या एकाने देवा पुढच्या जन्मी कॉर्पोटरेट मजदूर नको रे बनवू असे म्हटले आहे. अशा वेगवेगळ्या कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @_khushibatra_ या अकाऊंटवर शेअर करम्यात आला आहे.
सध्या रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाची क्रेझ प्रचंड आहे. याचा सिक्वील २ आला असून देशभरातील थेटर्स हाऊसफुल झाले आहेत. या चित्रपटातील डायलॉग्स, अॅक्शन सीन आणि गाणी प्रचंड ट्रेंड होत आहे. तरुणांपासून लहानांपर्यंत हा चित्रपट सर्वांच्याचा पसंतीस पडलत आहे
कोल्ड ड्रिंकने भरलेला ट्रक रस्त्यावर पलटला अन् मदतीऐवजी लोकांनी सुरु केली लूटमार; घटनेचा Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






