म्हणून दुसऱ्याच्या घरात घुसू नये! बिबट्याला पाहताच महिलेने त्याला असं फरफटत आत खेचलं... जंगलाचा शिकारी पण घाबरला; Video Viral
बिबट्या हा जंगलाचा एक धोकादायक शिकीरी आहे, त्याच्या शिकारीने संपूर्ण जंगल हादरतं. पण मानवी वस्तीत मात्र त्याचा काही टिकाव लागला नाही. बिबट्याने जेव्हा पहिल्यांदा मानवी वस्तीत एंट्री घेतली तेव्हा त्याचे असे हाल केले की जन्मभर त्याला ते विसरता येणार नाही. जंगलाचा शिकारी एका महिलेच्या घराबाहेर गेला आणि तिथेच त्याचा अनोखा स्वागतसमारंभ झाला. महिलेने शिकाऱ्याची अशी हालत केली की पाहणारे पाहतंच राहिले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्हाला बिबट्या दिसत असेल. त्याच्या अंगावर एक कपडा टाकलेला असतो आणि त्याच्या पायाला एका दोरीने बांधलेले असते. आता व्हिडिओत त्याच्या पायाला दोरी बांधलेली देखील दिसते. बिबट्या खरंतर घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण तितक्यातच महिला पायात बांधलेल्या दोरीने त्याला पकडते आणि जोरात घरात खेचते. असा दावा केला जात आहे की बिबट्या एखाद्याच्या घरात घुसला होता, जिथे एका महिलेने त्याला अशा प्रकारे पकडले. ही घटना उदयपूरमधील आहे. महिलेने घाबरण्याऐवजी, धैर्याने आणि प्रसंगावधान राखून बिबट्याला धडा शिकवला. नंतर काही वेळातच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले.
हा व्हायरल व्हिडिओ @_mr.nomi_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला अधिक माहिती हवी आहे, तिने हे कसे केले हे मला जाणून घ्यायचे आहे. किती धाडसी कृत्य” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “महिलेसोबत पंगा नाय घ्यायचा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिने ते कसे बांधलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.