पैठणीसाठी वहिनींमध्ये सुरु झाली हाणामारी, होम मिनिस्टर स्पर्धेतील Viral Video पाहून पोट धरून हसाल
सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. या उत्सवादरम्यान जागोजागी वेगवगेळे खेळ, कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यात अनेक मजेशीर खेळांचा समावेश असतो. मुखतः महिला वर्ग किंवा लहान मुले अशा सार्वजनिक खेळांमध्ये भाग घेत असतात. यात विजेत्यासाठी आकर्षक बक्षिसदेखील ठेवले जाते. हे बक्षीस जिंकण्यासाठी महिला अगदी जीवाचं रान करतात. सध्या अशाच एका स्पर्धेतील एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पैठणी जिंकण्यासाठी महिलांमध्ये अक्षरश: हाणामारी झाल्याचे दिसून येत आहे.
होम मिनिस्टर हा कार्यक्रम तर तुमच्यापैकी अनेकांना ठाऊक असावा. हा कार्यक्रम टीव्हीवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक होता. विशेषतः महिलांना या कार्यक्रमाचे फार वेड. हेच कारण आहे की, देशात कोणताही सण असला की जागोजागी महिलांसाठी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात महिला सहभागी होऊन जिद्दीने बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. खेळात जिंकलेल्या महिलेला मनाची पैठणी दिली जाते. सध्या अशाच होम मिनिस्टरमधील एका खेळाचा रंजक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. व्हिडिओतील महिलांनी पैठणीसाठी एकमेकींना दिलेली झुंझ पाहून आता अनेकजण व्हिडिओची मजा लुटत आहे.
हेदेखील वाचा – हा खरा श्रावणबाळ! मंदिराच्या पायऱ्या चढताना आईला त्रास होऊ नये म्हणून लेकाने कडेवर उचलले, हृदयस्पर्शी Video Viral
व्हिडिओमध्ये काही महिला खाली बसून समोर चाललेला खेळ बघत आहेत. तर दोन महिलांच्या भोवती एक रिंगण असून महिला या रिंगणात उभ्या आहेत. दोन्ही महिलांच्या हातात एक फुगा असून खेळाप्रमाणे दोघीही एकमेकींचा फुगा फोडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसून येत आहे. ज्याचा फुगा फुटेल तो हा खेळ हरणार आणि ज्याचा फुगा राहील तो विजयी ठरणार असा या खेळाचा नियम आहे. शेवटी तर महिला एकमेकींच्या अंगावर पडतात मात्र हातातून तो फुगा काय सोडायला तयार होत नाहीत. खेळ जिंकण्यासाठी महिलांनी केलेली कसरत पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.
हेदेखील वाचा – मृत्यूच्या रिंगणात उतरले किंग कोब्रा अन् अजगर, थरारक दृश्ये पाहून काळीज हलेल, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @b_vishal_ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 20 लाखा अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तूम्ही दोघी पैठणी साठी एकमेकाचे फुगे फोडताय पण तुम्ही एकमेकांचे फोडले नसते तर दोगिना मिळाली असती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खाली पडली बाबा अवघड आहे”. अनेकांनी कमेंट्समध्ये हसण्याचे ईमोजी देखील पाठवले आहेत.