सध्या सर्वत्र नवरात्रीचे वारे वाहत आहेत. सगळीकडे नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. देवीचे गाणे, भजन, गरबा दाडिंया यांचा मेळावा जिथे तिथे भरत आहे. देवीला समर्पित असलेल्या या सणानिमित्त अनेकजण देशातील देवीच्या वेगवगेळ्या मंदिरांना भेट देत असतात. सध्या यासंबंधीचाच एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक मुलगा त्याच्या वृद्ध आईला कडेवर घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसून येत आहे. व्हिडिओतील सुंदर दृश्ये तुम्हाला सुखावून जातील.
सध्या कलियुगातील श्रावणबाळाचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात मुलगा आपल्या आईची सेवा करताना दिसून येत आहे. ज्या आईने आपल्याला जन्म दिला, आपल्यासाठी काबाडकष्ट केले तिची वृद्ध वयात सेवा करणे हे मुलाचे कर्तव्य असते. आईची सेवा करणाऱ्या या श्रावणबाळाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांनी आपल्या आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या आईची आठवण येईल एवढे मात्र नक्की.
हेदेखील वाचा – मृत्यूच्या रिंगणात उतरले किंग कोब्रा अन् अजगर, थरारक दृश्ये पाहून काळीज हलेल, Video Viral
व्हिडिओत पाहिले तर मंदिराच्या आवारातले काही दृश्ये दिसत आहेत. यात एका मुलगा पायऱ्यांवर आपल्या वृद्ध पुढे आईला कडेवर घेऊन वर चालताना दिसत आहे. मुलाच्या या कृतीने आई इतकी खुश होते की, कडेवरून खाली उतरल्यावर ती त्याच्या गालावर प्रेमाने एक पापा देते आणि त्याचे लाड करते. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून आता अनेकांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमलले आहे.
हेदेखील वाचा – धक्कादायक! भररस्त्यात तरुण महिलेसोबत करू लागला बळजबरी, सीसीटीव्हीत घटना कैद, Video Viral
आई मुलाच्या नात्यातील प्रेम दर्शवणारा हा गोड व्हिडिओ @lay_bhari_official नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, एका आईच्या दर्शनासाठी दुसऱ्या आईला कडेवर घेऊन जाणारा श्रावण बाळ असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाइक करत यावर आपली पसंती दर्शवली आहे तर काहींनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “माऊली खूप पुण्य आणि जगात कुठेही न भेटणारं सुख समाधान तुम्ही आज मिळवलयं तुम्हाला माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे मी शिर्डीकर एक शिवभक्त” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुसऱ्या आईला पाहण्यासाठी आपल्या आईला घेऊन जाताना”.