Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

Baby Delivery On Road : रुग्णालयाने नकार दिला, अखेर रस्त्यावरच महिलेने दिला बाळाला जन्म. मदतीसाठी महिलांनी हात पुढे केला आणि साडीच्या आडोश्यात झाला बाळाचा जन्म. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर ट्रेंड करतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 30, 2026 | 03:02 PM
रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात अचानक प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्याने रस्त्यावरच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली.
  • स्थानिक महिलांनी तत्परतेने मदत करत सुरक्षित वातावरण तयार केले.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आई होणं काही साधं काम नाही. यासाठी महिलेला प्रचंड वेदनांतून बाहेर पडाव लागतं पण जेव्हा तिच्या हातात आपलं बाळ येतं तेव्हा सर्व सुख जणू तिच्या ओंजळीत येऊन पडल्यासारखं वाटतं. प्रसुतीच्या या कळ कधी आणि कुठे येतील ते सांगता येत नाही. अशात बऱ्याच वेळी इमरजेंन्सीच्या काळात डॉक्टरांच्या मदतीशिवायच महिलेची प्रसूती केली जाते. मागे रेल्वे स्टेशनवर झालेल्या महिलेच्या प्रसूतीची चर्चा जोरदार रंगली होती. अशीच एक घटना यावेळी रस्त्यावर घडून आल्याचे दिसले. ही घटना पुण्यातील एका महिलेसोबत घडली. अचानक कळा आल्या आणि महिलेला या वेदना असहाय्य होऊ लागल्या. मग काय… काही महिलांनी मदतीचा हात पुढे करत साड्यांच्या रिंगणात महिलेची प्रसुती पार पाडली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. यातील मुलाचे देखणे रुप आता यूजर्सच्या चेहऱ्यावर चांगलेच हसू आणत आहे. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

वाढदिवसाची नशा की वेडेपणा… ! पेट्रोल ओतलं, रस्त्यावर आग लावून तरुणाने साजरा केला बर्थडे; Video Viral

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, २३ वर्षांची सुप्रिया नितेश काळे गरोदर होती. काही दिवसांपूर्वी ती पुण्याजवळील शिरुर येथील निर्माण चाैकातून जात होत्या. याच वेळी, सुप्रिया काळे यांना अचानक चक्कर येऊ लागली आणि त्यांना प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यांना होत असलेल्या प्रसुतीच्या वेदना आणि बिकट होत असलेली अवस्था पाहून आजूबाजूच्या महिलांनी मदतीसाठी धाव घेतली. जवळून डॉ. सुनीता पोते यांना बोलावण्यात आले. कारण तिची प्रकृती इतकी खालावली होती की तिला रुग्णालयात नेण्यापर्यंत फार उशीर झाला असता. अखेर महिलांना रस्त्यावरच साड्यांनी एक वर्तुळ तयार केलं आणि यात सुप्रयाच्या बाळाला जन्म देण्यात आला. सांगण्यात येत आहे की, त्या दिवशी सुप्रिया प्रसुतीसाठी दाखल झालेल्या रुग्णालयातून परत येत होती. पण तिथे अल्ट्रासाऊंड मशीन काम करत नसल्याने रुग्णालयाने तिला दाखल करण्यास नकार दिला. परिणामी परिस्थिती इतकी बिकट झाली की तिची रस्त्यावरच प्रसूती करावी लागली.

उपचारादरम्यान मुलावर भूताटकीचं सावटं, भिंतीवर चढत करु लागला विचित्र प्रकार, त्या थरार घटनेचा Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @zindagi.gulzar.h नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्यांनी चांगले काम केले आहे, परंतु त्यांनी त्या बाळाला सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करू नये; हे पूर्णपणे प्रसिद्धीसाठीच आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता त्याला आयुष्यभर हे ऐकावं लागेल की त्याला रस्त्यावरुन उचलून आणलंयक” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्या महिला डॉक्टरांचे, तसेच डॉक्टरांना माहिती पुरवणारे कर्मचारी, उपस्थित महिला भगिनी आणि औषध विक्रेते- या संपूर्ण टीमचेही मनःपूर्वक आभार”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Women united to safely deliver a baby during a roadside emergency in pune viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • pregnancy
  • Pune
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.