(फोटो सौजन्य: Instagram)
तरुणाने या घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला आणि नंतर सोशल मिडियावर याला सर्वांसोबत शेअर केले. पण नेहमी आपल्याला जसं वाटतं तसं घडत नाही तेच खरं. प्रसिद्धीसाठी तरुणाने केलेला हा अजब प्रकार त्याच्यावरच उलटला आणि व्हिडिओ व्हायरल होताच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. सांगण्यात येत आहे की, या घटनेनंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेत तरुणीला लगेच अटक केली ज्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे.
नक्की काय घडलं?
मुंबईतील एका ३३ वर्षीय कार डीलरने आपला वाढदिवस धोकादायक पद्धतीने साजरा केला, ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. गोरेगाव पश्चिम, जोगेश्वरी येथील या कार डीलरने, सनटेक सिटी फोर्थ अव्हेन्यू बाहेरील एमएमआरडीए रस्त्यावर पेट्रोल ओतून आणि आग लावून वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन शूट केले. या धोकादायक कृत्यामुळे रस्त्याचे चार ठिकाणी नुकसान झाले आणि पार्क केलेले वाहने देखील आगीच्या कचाड्यात अडकता अडकता राहिली. ही आग जास्त पसरली असती तर आजूबाजूच्या गाड्या जळून खाक होण्याची शक्यता होती. तरुणीच्या या धोकादाय सेलिब्रेशनने शेवटी त्यालाच अडचणीत आणले आणि मुंबई पोलिसांनी तातडीने व्यक्तीवर कायेदशीर कारवाई करण्यास सुरुवात केली. व्हिडिओत दिसते की, आपला ३३ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी तरुणाने रस्त्यावर पेट्रोलने ३३ आकडा रेखाटला आणि मग त्याला आग लावली.
सदर घटनेचा व्हिडिओ @mo.of.everything नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून इंटरनेटवर हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे. अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “त्याला उलटा टांगून त्याच्या पाठीवर ३३ वेळा फटके मारा… तो अज्ञानी माणूस आपली जन्मतारीख विसरून जाईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मानलं, पेट्रोल त्याचे असेल, पण रस्ता त्याचा नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बॉलीवूड इफेक्ट”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






