Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वात धोकादायक नोकरी, काम फक्त दिवे लावण्याचं अन् पगार कोट्यवधी रुपये; प्रत्येक क्षणी असतो मृत्यूचा धोका…

Dangerous Job : काम सोपं, कोट्यवधी पैसे पण दररोज जीवाला मृत्यूच्या जवळून परत आणणे... तुम्ही असा जाॅब करणं पसंत कराल का? ही नक्की कोणती नोकरी आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 10, 2026 | 10:30 AM
जगातील सर्वात धोकादायक नोकरी, काम फक्त दिवे लावण्याचं अन् पगार कोट्यवधी रुपये; प्रत्येक क्षणी असतो मृत्यूचा धोका...

जगातील सर्वात धोकादायक नोकरी, काम फक्त दिवे लावण्याचं अन् पगार कोट्यवधी रुपये; प्रत्येक क्षणी असतो मृत्यूचा धोका...

Follow Us
Follow Us:
  • समुद्राच्या मध्यभागी असलेली ही नोकरी साहसासोबतच मोठा धोका घेऊन येते.
  • वादळे, प्रचंड लाटा आणि एकाकीपणामुळे कर्मचाऱ्यांना सतत सतर्क राहावे लागते.
  • आकर्षक पगार असला तरी या कामात जबाबदारी आणि जोखीम दोन्ही खूप मोठ्या असतात.
नोकरी तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केली जाते. पण तुम्ही कधी अशी नोकरी करायला पसंत कराल की, जिथे पैसा तर खूप मिळेल पण तुमचा जीव नेहमीच मृत्यूच्या दारात अडकून राहिल… लाईटहाऊसची नोकरी ऐकायला जितकी सोपी वाटते तितकी सोपी ती सत्यात नाही. समुद्राच्या मध्यभागी बांधलेल्या उंच लाईटहाऊसवर प्रकाश नेहमीच तेवत ठेवणे हा देखील एक जाॅब आहे. या प्रकाशामुळे जहाजांना समुद्रात आपला मार्ग शोधता येतो. पण या नोकरीमागे अनेक धोकादायक सत्य दडलेले आहे. चोहीकडे खोल समुद्र, सोसाट्याचा वारा, उंच लाटा आणि कोणत्याही क्षणी येऊ शकणारी धोकादायक वादळे यामुळे लाईटहाऊसचा जाॅब एक धोकादायक जाॅब ठरतो. अनेकदा कर्मचाऱ्यांना इथे एकटेच राहावे लागते, ज्यामुळे गंभीर परिस्थितीत इथे मदतीची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही.

बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वरच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral

या सर्व अडचणींमुळेच ही नोकरी जगातील सर्वात जोखमीची नोकरी मानली जाते. इथे नेहमीच सतर्क राहावे लागते, कारण एक लहान चूक मोठा अपघात घडवून आणवू शकते. पगार आणि इतर सुविधांमुळे ही नोकरी अत्यंत आकर्षक वाटत असली तरी इथे काम करणाऱ्यांना आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतो. साहस आणि धोक्याचे हे अनोखे मिश्रणंच या नोकरीला धोकादायक बनवते.

जर तुम्हाला एकटे राहायला आवडत असेल आणि साहसपूर्ण नोकरी करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर लाईटहाऊसचा जाॅब तुमच्यासाठी एक योग्य पर्याय ठरेल. भारतात या नोकऱ्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या डायरेक्टोरेट जनरल ऑफ लाइटहाउस एंड लाइटशिप्स (DGLL) द्वारे प्रशासित केली जाते. पूर्वी लाईटहाऊस कर्मचारी फक्त दिवे लावण्याचे काम करत होते पण आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे काम आता टेक्निकल आणि जबाबदाऱ्यांनी भरपूर बनले आहे.

आता रोबोट देणार आध्यात्माचा सल्ला! दक्षिण कोरियातील ‘रोबोटिक भिक्षू’ची जगभरात चर्चा; हात जोडले अन्… Viral Video ने वेधले लक्ष

इंस्टाग्रामवर @nasirbaghade नावाच्या अकाऊंटवर लाईटहाऊसचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात या नोकरीविषयीची सर्व माहिती देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना लाइट सिग्नलमध्ये बिघाड होणार नाही यावर लक्ष ठेवावे लागते. याव्यतिरिक्त, फ्रेनेल लेन्स स्वच्छ करणे, बल्ब बदलणे आणि डिझेल जनरेटरसारख्या पर्यायी वीज स्रोतांची देखभाल करणे या कामांचाही यात समावेश असतो. वाऱ्याचा वेग आणि समुद्राची स्थिती यांसारख्या हवामानविषयक माहितीची नोंद करणे, तसेच सागरी सुरक्षितता सुनिश्चित करणे हे देखील या कामाचा एक भाग आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: World most dangerous job risky life of lighthouse workers viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Job
  • trending
  • viral news

संबंधित बातम्या

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी
1

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
2

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
3

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
4

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.