young man use amazing trick to cross water on road video goes viral
सोशल मीडिया सध्या मनोरंजनाचे उत्तम साधन बनले आहे. रोज काही ना काही मजेशीर पाहायला मिळते. आपल्या देशाताली रस्त्यांची परिस्थिती कोणापासून लपलेली नाही. पावळ्यात तर सर्व रस्ते अगदी गायब होऊन जातात. रस्त्यांना नदी आणि नाल्यांचे रुप येते. खड्डे अगदी पाण्याने तुंब भरलेले असतात. तुम्ही अनेक भागांमध्ये रस्ते पाण्याखाली गेलेले आणि लोक पाण्यात बुडत असताना पाहिले असतील. अगदी मजबूत कॉंक्रीटचा देखील निचरा झालेला असतो.
मात्र य रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जाण्यासाठी पठ्ठ्याने एक भन्नाट मार्ग काढला आहे. यामुळे तो पाण्याता भिजण्यापासून वाचला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर भरपूर पाणी साठलेले आहे. रस्त्याच्या मध्यभागात ओलांडण्यासाठी विटा ठेवण्यात आला आहेत. यामुळे पायी जाणाऱ्यांसाठी मार्ग सोपा झाला आहे. मात्र एका सायकल स्वाराला रस्ता ओलांडणे थोडे अवघड जात आहे. पण या सायकल स्वाराने असा भन्नाट पराक्रम केला आहे की, तुम्ही त्याचे कौतुक कराल पण सोबतच तुम्हाला हसू आवरणे कठीण होईल. तर यापठ्ठ्याने सायकलचा हॅंडल धरला आणि बाजूला असलेल्या भिंतीवर पाय ठेवले आहे. आणि एका सुपरहिरोसारखे भिंतावर चालत सायकल पुढे नेत रस्ता ओलांडला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर भन्नाट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने पठ्ठ्याला स्पायडरमॅनचा भाऊ म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने ही आयडिया भारतातून बाहेर नाही गेली पाहिजे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने भारत दिवसेंदिवस असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @smile_connection_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.
याला म्हणतात स्वत:च्या पायवर कुऱ्हाड मारणे! रिलसाठी बाईक स्टंट करायला गेला अन्…, पहा नेमकं काय घडलं?
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.