याला म्हणतात स्वत:च्या पायवर कुऱ्हाड मारणे! रिलसाठी बाईक स्टंट करायला गेला अन्..., पहा नेमकं काय घडलं?( फोटो सौजन्य : व्हिडिओ स्क्रीनशॉट )
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेष करुन यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सामावेश असतो. प्रसिद्धीसाठी आणि मुलींचे लक्ष वेधण्यासाठी तरुण मंडळी आपला जीव धोक्यात घालताता. यामुळे अनेकांचा भीषण अपघात देखील झाला आहे. मात्र ही तरुण मंडळी सुधारम्याचे वाल काय घेत नाही.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणाचा बाईक स्टंट त्याला चांगालाच महागात पडला आहे. हिरोगिरीच्या नादात तरुणाचे तोडं फुटले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, भर रस्त्यात बाईक स्टंट करत आहे. सुरुवातील तरुण भरधाव वेगात बाईक पळवताना दिसत आहे. त्यानंतर तरुण बाईक वाकडी तिकडी चालवायला लागतो. रिलसाठी हा सर्व प्रकार सुरु आहे. रिल बनवण्यासाठी तरुण बाईक हवेत उडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु अचानक बाईक घसरते आणि तरुण धापकन तोडांवर आदळतो. तरुणाला बाईकचा बॅलेन्स संभाळता येत नाही, ज्यामुळे तो पडतो. सध्या या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओची मज्जा लुटली आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हायरल व्हिडिओ
रील के चक्कर में रीढ़ की हड्डी तोड़ ली..
स्टंट करने का नतीजा यही होता है, सफल कम सफाया ज्यादा कर देता है😄 pic.twitter.com/smnj3RcqdH
— Adv.Nazneen Akhtar (@NazneenAkhtar23) July 23, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत अनेकांनी यावर चांगलीच अद्दल घडली असे म्हटले आहे. एका युजरने मला खूप मजा आली असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आता कधीच स्टंट करायला उठणार नाही असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका युजरने यांना अद्दल घडल्याशिवाय लक्षातच येत नाही असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हारल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.