कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO
सोशल मीडियावर रोज लाखो भन्नाट अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भयावह असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये असे काही लिहिले आहे की, हा पोस्टपाहून तुम्हाला काय बोलावे ते सुचणार नाही.
मैत्री एक जिवाभावाचे नाते आहे. या जीवाभावाच्या मैत्रीसाठी अनेक लोक जीव द्यायलाही तयार होतात. संकटाच्या काळात एकमेकांची मदत करायला मागे पुढे पाहत नाहीत. मग यामध्ये पैशाचीही मदत करण्यात कोणी विचार करत नाही. मात्र अनेक मित्र असे असतात की, मदत म्हणून दिलेले पैसे परत देण्याचे नावही काढत नाही. त्यात तो आपला चांगला मित्र म्हणून पैसे कसे मागायचे असा विचार करुन लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र या गोष्टी बऱ्याचदा मनात राहतात.
मात्र, एका व्यक्तीने आपल्या मित्राला धडा शिकवण्यासाठी काही भलताच पराक्रम केला आहे. या व्यक्तीने उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घराबाहेर असा बॅनर लावला आहे की, हा बॅनर वाचून त्याचा मित्र परत कोणाकडून उधारी घेण्याचा विचारही करणार नाही. सध्या हा बॅनर सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्य तुम्ही पाहू शकता की, एका पोस्टमध्ये उधार घेतलेल्या व्यक्तीचे नाव लिहिण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये संबंधित व्यक्तीने घेतलेली रक्कम लिहून लवकरात लवकर परत करण्याची विनंती करण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. हा बॅनर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. पोस्टर शेअर करणाऱ्याने माझे पण पैसे एका मित्राने घेतले आहे, मी पण असा बॅनर लावू का असा प्रश्न केला आहे. तर इतर नेटकऱ्यांनी त्यांच्या मित्रांनी देखील पैसे घेतले असल्याचे म्हटले आहे. सध्या हा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.