Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेला अमेरिकेतूनच विरोध; युद्धातून माघार घ्यावी लागणार?

जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू पुरवठा मार्ग असलेला हा जलमार्ग फेब्रुवारी अखेरपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे जवळपास बंद आहे. यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 07, 2026 | 08:29 AM
Iran-US War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेला अमेरिकेतूनच विरोध; युद्धातून माघार घ्यावी लागणार?

Iran-US War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेला अमेरिकेतूनच विरोध; युद्धातून माघार घ्यावी लागणार?

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : सध्या इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून हल्ले केले जात आहेत. त्याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’वरून इराणला दिलेल्या धमकीत अत्यंत खालच्या पातळीवरील शब्दांचा वापर केल्याने अमेरिकन नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना आणि पुलांना उडवून देण्याचा इशारा दिला आहे. याला सत्ताधाऱ्यांनीही विरोध केला आहे.

जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू पुरवठा मार्ग असलेला हा जलमार्ग फेब्रुवारी अखेरपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे जवळपास बंद आहे. यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. हॉर्मुझ मार्ग खुला करण्यासाठी मदत न करणाऱ्या युरोपियन आणि नाटो मित्रदेशांवरही ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान,  राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसच्या अगदी जवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ‘लाफायेट पार्क’ जवळ मध्यरात्री ही घटना घडली तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते. सीक्रेट सर्व्हिसने परिसराची झडती घेतली असून, सुदैवाने यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षा यंत्रणा सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सिनेट सदस्य चक शुमर यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध करत त्याला ‘एका असंतुलित व्यक्तीची बडबड’ म्हटले आहे. त्यांच्या मते, ट्रम्प यांच्या अशा वागण्यामुळे मित्रदेश अमेरिकेपासून दूर जात आहेत. ट्रम्प यांच्या माजी सहकारी मार्जरी टेलर ग्रीन यांनीही कडक शब्दांत टीका करत म्हटले की, राष्ट्राध्यक्ष सध्या ‘वेडापिसा’ वागत असून प्रशासनातील लोकांनी यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे.

ट्रम्प सरकारच्या निर्णयाविरोधात जनता रस्त्यावर

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविरुद्धच्या युद्धाविरोधात, अमेरिकेतील ३३०० ठिकाणी ८० लाखांहून अधिक लोकांनी ‘नो किंग्स रॅली’ काढली आहे. अमेरिकेतील मोठ्या संख्येने लोक इराणविरुद्धच्या युद्धामुळे संतप्त आहेत. त्यांनी ट्रम्प यांचे कठोर स्थलांतर कायदे आणि महागाई यांसारखे मुद्देही उपस्थित केले आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेन्स यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

हेदेखील वाचा : US-Israel Iran War : “हिंमत दाखवा, होर्मुझला जा आणि तेल मिळवा…” डोनाल्ड ट्रम्प संतापले, संकटग्रस्त देशांना दिले दोन पर्याय

Web Title: 1194524opposition to donald trump aggressive stance emerges from within the us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • Israel-US War

संबंधित बातम्या

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित
1

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

Maharashtra Breaking News Updates Today: गेल्या १० दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग
2

Maharashtra Breaking News Updates Today: गेल्या १० दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान
3

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान

आधी Donald Trump यांनी दिले संकेत… आणि आता केलं ‘हे’ विधान, लवकरच क्रॅश होणार तेलाचे दर?
4

आधी Donald Trump यांनी दिले संकेत… आणि आता केलं ‘हे’ विधान, लवकरच क्रॅश होणार तेलाचे दर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.