Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 दिवसात 155 भूकंपांनी हादरलेलं जपान, सर्वात तीव्र भूकंप 7.6 रिश्टर स्केलचा; 13 जणांचा मृत्यू!

पश्चिम जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. उत्तर मध्य जपानमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 02, 2024 | 09:49 AM
1 दिवसात 155 भूकंपांनी हादरलेलं जपान, सर्वात तीव्र भूकंप 7.6 रिश्टर स्केलचा; 13 जणांचा मृत्यू!
Follow Us
Follow Us:

टोकियो : सोमवारी पश्चिम जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. काल एका दिवसात सुमारे 155 भूकंपांच्या धक्कांमुळे (Japan Earthquake) जपान हादरला. या भूकंपामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, जो मंगळवारी मागे घेण्यात आला.

[read_also content=”अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष वादात भोवऱ्यात,न्यू इयर पार्टीत स्टेजवर गर्लफ्रेंडला केलं किस! https://www.navarashtra.com/world/argentina-president-javier-milei-kissed-girlfriend-fatima-florez-on-stage-grps-494257.html”]

जपान मेट्रोलॉजिकल ऑफिस (जेएमओ) ने केलेल्या नोंदनुसार, सर्वात शक्तिशाली भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी होती. यानंतर 6 पेक्षा जास्त तीव्रतेचे अनेक धक्के बसले. नंतर भूकंपाची तीव्रता कमी झाली. बहुतेक हादरे तीनपेक्षा जास्त तीव्रतेचे होते.

त्सुनामी एक मीटरपेक्षा जास्त उंच लाटा उसळल्या

या भूकंपामुळे त्सुनामीच्या लाटा एक मीटरपेक्षा जास्त उसळल्या. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आगीही लागल्या. भूकंप आणि त्सुनामीमुळे संपूर्ण जपानमध्ये प्रचंड विध्वंस झाला. जपानमध्ये सध्या प्रचंड थंडी आहे.

भूकंपामुळे अनेक भागात वीज गेली असून, त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोसळलेल्या इमारती, बंदरातील बोटी, जळालेली घरे दिसत आहेत. भूकंपामुळे वाजिमा बंदराजवळ समुद्रात १.२ मीटर उंच लाटा उसळल्या. या लाटांच्या धडकेने बंदराचे नुकसान झाले आहे. इतरत्र लहान सुनामी आल्याची नोंद आहे.

पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी मदतकार्य करण्याची केली सूचना

भूकंपामुळे सुझूमध्ये अधिक विध्वंस झाला आहे. मंगळवारी या भागातील सुमारे 32,700 घरांमध्ये वीज नाही. हजारो लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लष्करी तळावर सुमारे 1,000 लोक राहत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
आपत्ती प्रतिसाद बैठकीनंतर सोमवारी उशिरा पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले, “मी आपत्कालीन कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या लवकर या भागात पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या खूप थंडी आहे. मी विमाने किंवा जहाजे वापरून पाणी, अन्न, ब्लँकेट इत्यादी पाठवले आहेत. गरम तेल, पेट्रोल, इंधन तेल यांसारख्या अत्यावश्यक पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: 13 people died so far in japan earthquake nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2024 | 09:41 AM

Topics:  

  • Japan

संबंधित बातम्या

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!
1

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी
2

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.