2 dead in plane crash in Venezuela
Venezuala Plane Crash News : पश्चिम व्हेनेझुएलात (Venezuela) भीषण दुर्घटना घडली आहे. एक विमान टेक ऑफनंतर काही वेळातच कोसळल्याने मोठा स्फोट झाला आणि आग लागली आहे. या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. व्हेनेझुएलाच्या टाकारी राज्याची राजधानी सॅन क्रिस्टोबल येथे ही दुर्घटना घडली आहे . या अपघातात दोन जणांनचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हा अपघात घडला.
‘इस्रायल अमेरिकेचा गुलाम…’ , नेतन्याहूंच्या वक्तव्याने उडाली खळबळ; जाणून घ्या काय म्हणाले?
सध्या या विमान अपघाताचा (Plane Crash) तपास सुरु असून तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात पाहणाऱ्यांनी सांगितले की, विमान धावट्टपीवरुन वेगाने टेकऑफ झाले होते, पण काही क्षणातच ते जमिनीवर कोसळे आणि मोठा स्फोट घडला. यानंतर विमानाने पेट घेतला. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
Video showing the crash of Piper PA-31T1 Cheyenne I, Venezuelan registration YV1443 (C/N 31T-7904013), at Paramillo Airport, in San Cristóbal, Venezuela, earlier today. According to local sources, there are two fatalities. (Via pro_plane_pilot) pic.twitter.com/Y3tvYtOttq — The Latin American Aviation Historical Society (@The_LAAHS) October 22, 2025
या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाने तातडीने आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले.
सध्या व्हैनेझुएलाच्या नागरी विमान वाहतूक संस्थेने या घटनेच्या सखोल चौकशीचे आगेश गिले आहे. घटनेचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमानाच्या ब्लॅक बॉक्स आणि इतर काही तांत्रिक उपकरणांची तपासणी केली जात आहे. तपासअधिकाऱ्यांच्या प्रथामकि तपासानुसार तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला. अपघाताच्या वेळी हवामनही सामन्य होते, यामुळे हा अपघात मानवी चुकीमुळे किंवा खराब हवामानामुळे घडला नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
FAQ(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. व्हेनेझुएलात विमान अपघात कोठे घडला?
व्हेनेझुएलाच्या टाकारी राज्याची राजधानी सॅन क्रिस्टोबल येथे एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे.
प्रश्न २. व्हेनेझुएलाच्या विमान दुर्घटनेत किती जीवितहानी झाली?
व्हेनेझुएलाच्या विमान दुर्घटनेतमध्ये दोन वैआगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
प्रश्न ३. काय आहे व्हेनेझुएलातील विमान अपघाताचे कारण?
सध्या व्हेनेझुएलातील विमान अपघाताचा तपास सुरु आहे. प्राथमिक तपासानुसार तांत्रिक बिघाडामुळे अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Uganda Accident : युगांडा हादरला! साखळी अपघतातमुळे रस्त्यावर हाहा:कार ; ५० हून अधिक लोकांचा मृत्यू