Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगावर काटा आणणारी दुर्घटना! दोन वर्षाचा चिमुकल्याचा २० व्या मजल्यावरुन पडून भयानक मृत्यू

अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. एक २ वर्षाच्या बाळ २० व्या मजल्यावरुन पडले आहे. बाळाचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 16, 2025 | 06:11 PM
2 year old boy falls from 20th floor of new jersey's Newark Apartment

2 year old boy falls from 20th floor of new jersey's Newark Apartment

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत भयावह दुर्घटना
  • न्यू जर्सीमध्ये २ वर्षाच्या चिमुकल्याचा उंच बिल्डिंगमधून पडून मृत्यू
  • संपूर्ण परिसरात खळबळ
America News in Marathi : न्यू जर्सी : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत (America) न्यू जर्सीमध्ये एका २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. २० व्या मजल्यावरुन पडून या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे, परंतु अद्याप बाळ कसे पडले याबाबत कोणताही पुरावा सापडलेला नाही.

Storm Claudia : क्लॉडिया युरोपमध्ये कहर! पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये भीषण पूरस्थिती, अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी

बाळाचा जागीच मृत्यू

न्यू जर्सीतील नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळी एका उंच इमारतीत ही घटना घडली. शनिवारी (१५ नोव्हेंबर) स्थानिक वेळेनुसार ७ च्या सुमारास ही घटना घडली. नेवार्कच्या पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या बाळाचे नाव आणि त्याच्या कुटुंबातील लोकांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. तपासामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

घटनेच्या चौकशीचे आदेश

या हृदयद्रावक घटनेवर नेवार्कचे सार्वजनिक सुरक्षा संचालक यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून सत्य लवकरात लवकर समोर येईल असे म्हटले आहे.

सध्या या घटनेने स्थानिक जनतेमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर #JusticeForToddler असा हॅशटॅग वापरला जात आहे. इमारतीच्या सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. एका स्थानिक नागरिकांच्या मते, पालकांच्या मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष न देण्यामुळे ही घटना घडली आहे. ही घटना एका कुटुंबासीठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक धडा आहे.

सध्या पोलिसांनी पालकांना खिडक्या बंद करण्याचे आणि मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे. घटनेचा तपास सुरु असून सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात आहे. जर पालकांचा निष्काळजीपणा आढळून आला, किंवा इमारत व्यवस्थापनाबाबत कोणतीही त्रुटी समोर आली तर त्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत सतत घडतात अशा घटना

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत दरवर्षी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. उंच इमारतींच्या खिडक्यांमधून आतापर्यंत ५००० मुलांचा मृत्यू झाला आहे किंवा गंभीर दुखापत झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरी भागातील उंच इमारतींमुळे या घटना घडत असून सुरक्षा व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे.

Trump Tariff : जनतेच्या दबावापुढे झुकले ट्रम्प? वाढत्या महागाईच्या तक्रारींमुळे कॉफी, चहासह या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा

Web Title: 2 year old boy falls from 20th floor of new jerseys newark apartment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

इराणमध्ये अजूनही अडकले हजारो भारतीय; कशी होणार सुटका? परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला ‘मास्टरप्लॅन’
1

इराणमध्ये अजूनही अडकले हजारो भारतीय; कशी होणार सुटका? परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला ‘मास्टरप्लॅन’

Middle East Conflict : आधी मुनीर आता शाहबाज शरीफ… सौदीमध्ये नेमकं शिजतंय काय? इराणविरोधात मैदानात उतरणार पाकिस्तान?
2

Middle East Conflict : आधी मुनीर आता शाहबाज शरीफ… सौदीमध्ये नेमकं शिजतंय काय? इराणविरोधात मैदानात उतरणार पाकिस्तान?

अमेरिकेचा सर्वनाश! Iran चे 750 स्लीपर सेल उडवणार टेक कंपन्या; ‘या’ शहरावर ड्रोन अन्…; एकच खळबळ
3

अमेरिकेचा सर्वनाश! Iran चे 750 स्लीपर सेल उडवणार टेक कंपन्या; ‘या’ शहरावर ड्रोन अन्…; एकच खळबळ

Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी
4

Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.