Storm Claudia : क्लॉडिया युरोपमध्ये कहर! पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये भीषण पूरस्थिती, अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Storm Claudi Strikes Europe : युरोपमध्ये क्लॉडिया वादळामुळे प्रचंड हाहा:कार माजला आहे. अनेक देशांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. युरोपमधील वेल्स, ब्रिटन, तसेच पोर्तुगालमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. शिवाय वारे देखील जोरात वाहत असून मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक लोक पुरामध्ये अडकले आहेत. सध्या पूरात अडकलेल्या लोकांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. तसेच सरकारने सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.
ब्रिटन आणि वेल्समध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरल्या असून अेक शहरे, खाडी पाण्याखाली गेले आहेत. तसेच ग्वेंटच्या तफालॉग परिसरात 81.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वेल्समध्ये सतत पाऊस पडत असून पाणी साचले आहे. यामुळे अनेक घरे आर्धी पाण्याखाली गेली आहेत. सध्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य सुरु आहे. वादळामुळे दोन जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याशिवाय वादळामुळे पोर्तुगालमध्येही हाहा:कार माजला आहे. सध्या परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. राष्ट्रीय आपत्कालीन आणि नागरी संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून आजपर्यंत तब्बल २,४३४ आपत्कालीन घटनांची नोंद करण्यात आली आहे. पोर्तुगालमध्ये पूरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
पोर्तुगालच्या सेतुबल आणि फारो जिल्ह्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उखडून पडली आहेत, वाहने वाहून गेली आहेत. अनेक घरे आणि रस्ते पाण्याखाली गेली आहेत. भूस्खलनामुळे देखील एक रस्ता पूर्णत: धसला आहे. तसेच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.
दक्षिण पोर्तुगालमध्येही मुसळधार पावसाचा तडाखा एवढा भीषण होता की शेकडो ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. येलो अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टी भागात मोठ्या लाटा धडकल्या आहेत. क्लॉडिया वादळामुळे युरोपमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या सरकार परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. हवामान विभागाने काही तास धोक्याचा इशारही दिला आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.






