Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ‘या’ आफ्रिकन देशातही दहशतवादाचे सावट; लष्करी हल्लात ५० सैनिकांचा मृत्यू

African country terror attack : पश्चिम आफ्रिकन देशातमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ५० हून अधिक सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 30, 2025 | 11:15 AM
50 killed in Terrorist attack on military camp in African country Burkina Faso

50 killed in Terrorist attack on military camp in African country Burkina Faso

Follow Us
Close
Follow Us:
  • पश्चिम आफ्रिका देश बुर्किना फासो येथे लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला झाला आहे.
  • JNIM या दहशतवादी संघटनेने हा दहशतवादी हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
  • देशात सत्तापालटाची मागणी केली जात आहे.

Burkina Faso Militant Attack : पश्चिम आफ्रिकन देश बुर्किना फासो येथे लष्करी तळावर मोठा दहशतवादी हल्ला (Terror Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात ५० हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसला स्थानिक समुदायाच्या प्रमुख हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, काही बंदुकधारी दहशतवाद्यांनी उत्तर बुर्किना फासोतील एका लष्करी छावणीवर धडाधड हल्ला केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

JNIM दहशतवादी संघटनेने हल्ला केल्याचा संशय

हा हल्ला जिहादी गट जमात नुसरत अल-इस्लाम वाल मुस्लिमन (JNIM) या मुस्लीम दहशतवादी गटाने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संघटनेने हल्ला घडवून आणला असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या दहशतवादी संघटनेवर रशियाने बंदी घातली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास १०० दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून लष्करी छावणीवर लूटमार केली. तसेच छावणीला पेटवून दिले. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शक्तिशाली भूकंपाने हादरला रशिया; 8.7 तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा

देशात सत्तापालटाची मागणी

बार्किनो फुसोमधील नागरिक आणि सैनिकांच्या मृत्यूसाठी शसस्त्र दल JNIM या दहशतवादी संघटनेला जबाबदार धरले जात आहे. या देशातील मोठा भाग JNIM शसस्त्र गटांकडून नियंत्रित केला जातो. या संघटनेनेमुळे देशाच्या राजधानी बाहेर तीव्र हल्ले घडले आहे. सध्याची परिस्थितीत अत्यंत विकट होत चालली आहे.

तसेच वाढत्या दशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये सत्तापालटाच्या चर्चा सुरु आहे. राजकीय आणि लष्करी संघटनांची पुनर्स्थापना करण्यात आली आहे, असे असूनही लष्करी नेते इब्राहिम त्राओर दहशतवादी संघटानांना रोखण्यात अयशस्वी ठरत आहे. यामुळे देशात सत्तापालटाची मागणी जोर धरत आहे.

देशात वाढते दहशतवादी हल्ले

देशातील नागरिकांनी वृतसंस्था असोसिएटेड प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, JINM संघटनेने लष्करी छावणीतील शस्त्रांची लुटमार केली आहे. अद्याप यावर लष्कराने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु या हल्ल्यात ५० हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. शिवाय यापूर्वी देखील बुर्किना फासोमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडले आहेत.

JINM कडून सर्वाधिक हल्ले बुर्किना फासोच्या दुर्गम भागात केले जात आहे. सध्या देशातील वाढत्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवळपास ६०० लोक मारले गेले आहे. या सर्वांची जबाबदारी देखील JINM ने स्वीकारली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Baba Vanga Prediction: पृथ्वीवर एलियन्सच सावट…! 2025 मध्ये घडणार काहीतरी भयानक; बाबा वेंगाचं ते भाकीतं ठरणार खरं

Web Title: 50 killed in terrorist attack on military camp in african country burkina faso

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • african country
  • terror attack

संबंधित बातम्या

India High Alert: भारताला दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट? ‘या’ महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश
1

India High Alert: भारताला दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट? ‘या’ महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश

काँगोमध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केले रक्तरंजित हत्याकांड; महिलांसह 66 जणांची निर्घृण हत्या
2

काँगोमध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केले रक्तरंजित हत्याकांड; महिलांसह 66 जणांची निर्घृण हत्या

पाकिस्तानचा अखेर झाला पर्दाफाश, दहशतवादी कारवायांसाठी भरावा लागणार डिजिटल दंड
3

पाकिस्तानचा अखेर झाला पर्दाफाश, दहशतवादी कारवायांसाठी भरावा लागणार डिजिटल दंड

Indians Kidnapped in Mali : मालीतून भारतीय नागरिकांचं अपहरण; सुटकेसाठी अल-कायदाने काय ठेवली मागणी? वाचा सविस्तर
4

Indians Kidnapped in Mali : मालीतून भारतीय नागरिकांचं अपहरण; सुटकेसाठी अल-कायदाने काय ठेवली मागणी? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.