Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचारात वकिलाच्या हत्येप्रकरणी 9 जणांना अटक; हिंदूंवर हल्ले सुरुच
ढाका: बांगलादेशात हिंदू समाजाचे नेतृत्तव करणारे तसेच ISKCON चे सचिव चिन्मय दास यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर हिंसाचार अधिक उफाळला. हिंदूवरील हल्ले वाढले. या हल्ल्यात एक वकिलाचा मृत्यू देखील झाला होता. त्यानंतर बांगलादेश न्यायालयाने घटनेच्या तपासाचे आदेश दिले होते. आता वकिलाच्या हत्येप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच हिंदूंवरील हिंसाचार सुरूच आहे. यामुळे हिंदूच्या सुरक्षेवर बांगलादेश सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने प्रश्नचिन्ह राहिले आहे.
वकिलाच्या हत्येप्रकरणी 9 जणांना अटक- घटना सीसीटीव्हीत कैद
काही दिवसांपूर्वी हिंदूंवर झालेल्या एका हल्ल्यात वकिलाचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी आता 9 जणांना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. वकिलाच्या हत्येची घटना चिन्मय दास यांना तुरुंगात नेत असताना जमलेल्या जमावादरम्यान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चकामकीदरम्यान घडली होती. या प्रकरणात चंदन दास याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली. बांगलादेश पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो धारदार शस्त्राने इस्लाम यांच्यावर हल्ला करताना दिसला आहे.
वकिलांच्या संघटनेत तीव्र आक्रोश
चितगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अब्दुल करीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी बहुतेक जण सेबोक कॉलनीचे रहिवासी असून ते स्वच्छता कर्मचारी आहेत. सध्या या आरोपात सहभागी असलेल्या इतर आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. या घटनेने बांगलादेशभर संतापाची लाट उसळली आहे. वकिलांच्या संघटनांनी आणि काही राजकीय गटांनी इस्लामच्या मारेकऱ्यांवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
बांगलादेश हिंदूवर हल्ले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हिंदूंवरील अत्याचाराचे सत्र सुरूच
तर दुसरीकडे, काही गटांनी इस्कॉन बांगलादेशवर बंदी घालण्याची मागणी केली. मात्र, इस्कॉन बांगलादेशने या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि सांगितले की, चिन्मय कृष्ण दास यांना पूर्वीच संघटनेतून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात न्यालयाकडून अटक जारी करण्यात आले. त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हिंदूमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला होता.
हिंदूवरील अत्याचारांचे सत्र देखील अद्याप सुरू आहे. मात्र, या प्रकरणावर बांगलादेश सरकारने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता सरकारकडून हिंदू अल्पसंख्यकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.