फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कीव: रशिया-युक्रेन युद्ध गेल्या दीड वर्षापासून पेटले होते. दोन्ही देशांमध्ये सत्त हल्ले सुरू होते. मात्र आता युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या एका वक्तव्याने या युद्धाला नवे वळण दिले आहे. यामुळे जगभरातील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अडीच वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या प्राणघातक संघर्षामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शांततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी रशियाला युक्रेनचा भूभाग देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.
युद्धविरामासाठी रशियाला युक्रेनची अट मान्य करावी लागणार
मीडिया रिपोर्टनुसार, व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शांततेसाठी रशियाला युक्रेनियन प्रदेश देण्याचे मान्य केले आहे, मात्र यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. त्यांच्या मते, हा भूभाग तात्पुरता नाटोच्या संरक्षणाखाली राहणार आहे. झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे की, युद्धविरामानंतर नाटोच्या मदतीने राजनयिक मार्गाने हा प्रदेश परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यांचा हा निर्णय युक्रेनच्या राजकीय धोरणामध्ये मोठा बदल घडवून आणू शकतो असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी युक्रेन सरकारने आपली आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सीमा परत मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका घेतली होती. यामध्ये 2014 मध्ये रशियाने जप्त केलेला क्राइमिया तसेच 2022 मध्ये ताब्यात घेतलेले चार इतर प्रदेश सामील आहेत. मात्र, झेलेन्स्की यांनी पहिल्यांदाच शांततेसाठी भूभाग सोडण्याची तयारी व्यक्त केली आहे. पण रशियाला युक्रेनची अट मान्य करावी लागेल. यामुळे यावर रशिया आता काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
काही भाग नाटोच्या संरक्षणाखाली
व्लादिमिर झेलेन्स्कीर यांनी म्हटले आहे की, “जर युद्ध थांबवायचे असेल शांतता प्रस्थापित करयची तर कठोर निर्णय घ्यावे लागतील.” तसेच त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, ” युक्रेनचा काही भाग नाटोकडे त्याच्या संरक्षणाखाली राहिल. रशियाला हा भाग तात्परुरत्या स्वरुपात देण्यात येईल. हा मार्ग युद्ध थांबविण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे. झेलेन्स्की यांच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जगभरातील लोकांचे लक्ष रशिया-युक्रेनकडे
काही तज्ञांच्या मते, हा निर्णय युक्रेनसाठी एक धोरणात्मक पाऊल आहे, ज्यामुळे युद्ध थांबून पुढील वाटाघाटींसाठी मार्ग खुला होईल. तर काहींच्या मते, हा निर्णय युक्रेनच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणारा आहे. जगभरातील देश या स्थितीकडे बारकाईने पाहत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध थांबण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र, याचे दीर्घकालीन परिणाम काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.