Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : ‘इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल’; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान

अमेरिका आणि इराण यांच्यात होणारा करार हा (माजी अध्यक्ष) बराक ओबामा आणि जो बायडेन यांनी स्वाक्षरी केलेल्या जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन (JCPOA) पेक्षा खूपच चांगला असेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2026 | 07:33 AM
Iran-US War : 'इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल'; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान

Iran-US War : 'इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल'; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराणवर हल्ल्यांमुळे जागतिक तेल संकट ओढवताना दिसत आहे. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केले आहे. ‘इराणसोबतचा संभाव्य नवीन करार हा माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्या कार्यकाळात तेहरानसोबत झालेल्या करारापेक्षा चांगला असेल. इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका आणि इराण यांच्यात होणारा करार हा (माजी अध्यक्ष) बराक ओबामा आणि जो बायडेन यांनी स्वाक्षरी केलेल्या जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन (JCPOA) पेक्षा खूपच चांगला असेल. त्यांनी जुन्या कराराला अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आणि सर्वात वाईट करारांपैकी एक म्हटले. ट्रम्प यांनी दावा केला की, या करारामुळे इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याचा मार्ग मिळू शकला असता, जो त्यांच्या प्रशासनाने रोखला. त्यांनी असाही आरोप केला की, त्यावेळी इराणला अब्जावधी डॉलर्स रोख रक्कम देण्यात आली होती आणि ही रक्कम अमेरिकन बँकांमधून काढण्यात आली होती.

Ibrahim Azizi : ‘आम्हाला युद्धाशिवाय काहीच दिसत नाही…’ कूटनीती संपली; इराण संसदेचे वरिष्ठ नेते अझीझींचे सूचक विधान

तसेच जर हा करार रद्द केला नसता, तर पश्चिम आशिया आणि इस्रायलसह अनेक प्रदेशांमध्ये अण्वस्त्रांचा धोका वाढला असता. जर त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन करार झाला, तर त्यामुळे जगभरात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित होईल आणि पूर्वीच्या सरकारांच्या चुका सुधारल्या जातील, असे म्हणत ट्रम्प यांनी ओबामा आणि बायडेन सरकारवर निशाणा साधला.

व्हाईट हाऊसची पोस्ट चर्चेत

दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, व्हाईट हाऊसने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टकडे केवळ एक ‘नेहमीचा संदेश’ म्हणून दुर्लक्ष करणे कठीण आहे; कारण ही पोस्ट मध्यपूर्वेतील एका मोठ्या लष्करी घडामोडीकडे निर्देश करणारा थेट संकेत मानली जात आहे. सोमवारी (दि.२०) व्हाईट हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फोटो शेअर करण्यात आला. या फोटोसोबत अत्यंत आक्रमक स्वरूपाची एक ओळ (कॅप्शन) लिहिलेली होती: ‘LOCKED IN MODE: ACTIVATED… आज सोमवार आहे. कोणतीही सबब नाही. फक्त विजय.’

Web Title: A new deal with iran will establish peace in the world says donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 07:16 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • Iran-US War

संबंधित बातम्या

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय
1

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?
2

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?
3

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश
4

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.