Ibrahim Azizi : 'आम्हाला युद्धाशिवाय काहीच दिसत नाही...' कूटनीती संपली; इराण संसदेचे वरिष्ठ नेते अझीझींचे सूचक विधान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Ibrahim Azizi Iran Parliament statement : जगभरातील मुत्सद्दी आणि नेते अमेरिका-इराणमधील (US-Israel Iran War) तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच, इराणकडून एक अत्यंत धक्कादायक आणि आक्रमक विधान समोर आले आहे. इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सामर्थ्यशाली प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी थेट जाहीर केले आहे की, इराण अमेरिकेसोबतच्या चर्चेला शांतता प्रक्रिया मानतच नाही. त्यांच्या मते, या वाटाघाटी म्हणजे केवळ ‘युद्धभूमीचा विस्तार’ असून, इराणचा उद्देश त्यातून लष्करी यश मिळवणे हाच आहे.
इब्राहिम अझीझी यांच्या विधानामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आम्ही सध्याच्या चर्चांना रणांगणाचाच एक भाग मानतो आणि आम्हाला त्यात युद्धाशिवाय दुसरे काहीही दिसत नाही.” याचा अर्थ असा की, इराण शांततेसाठी चर्चा करत नसून, रणांगणावर जे यश मिळाले आहे, त्याला अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी किंवा पुढील लष्करी हालचालींसाठी वेळ मिळवण्यासाठी वाटाघाटींचा वापर करत आहे. अझीझी यांच्या मते, जर चर्चेतून इराणच्या लष्करी ताकदीत भर पडणार असेल, तरच ती एक संधी म्हणून पाहिली जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : अमेरिकेने ‘Tuska’ रोखलं, प्रत्युत्तरात इराणने थेट US Navyलाच…’; पाहा ओमानच्या आखातात रातोरात काय घडलं?
येत्या काळात पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराणमध्ये महत्त्वाची चर्चा प्रस्तावित आहे. मात्र, या चर्चेत इराण खरोखर मनापासून सहभागी होणार का? या प्रश्नावर अझीझी यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, इराण आपले निर्णय कोणाच्या दबावाखाली घेत नाही. देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय हित (National Interest) जिथे सुरक्षित असेल, तोच मार्ग इराण निवडेल. अमेरिकेने जर या चर्चेचा वापर इराणवर दबाव टाकण्यासाठी किंवा मनमानी अटी लादण्यासाठी केला, तर तेहरान अशा चर्चांना केराची टोपली दाखवेल.
Talks with US “continuation of battlefield,” must serve national interest: Iranian MP Ebrahim Azizi Read @ANI Story |https://t.co/BhfB5k2136#IranianMP #EbrahimAzizi #UnitedStates #NationalInterest pic.twitter.com/gTnQ06nBxc — ANI Digital (@ani_digital) April 20, 2026
credit – social media and Twitter
अझीझी यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप करत म्हटले की, वॉशिंग्टन नेहमीच चर्चेच्या नावाखाली “बळजबरी आणि हुकूमशाही” करण्याचे प्रयत्न करते. मात्र, आजचा इराण बदललेला आहे. जोपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये समानता आणि परस्पर आदर राखला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही अर्थपूर्ण वाटाघाटी शक्य नाहीत. इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांचे धोरण केवळ संरक्षणात्मक नसून, गरजेनुसार ते आक्रमक रूप धारण करू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Naval War: चर्चेआधीच रणशिंग फुंकलं! USने इराणचे ‘Tuska Ship’ गोळीबार करून केले जप्त; ट्रम्प म्हटले, ‘धडा तर शिकवणारच’
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव, जहाजांची जप्ती आणि आता इराणच्या संसदेतील या प्रक्षोभक विधानामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट गडद होत आहे. इराणची ही भूमिका केवळ अमेरिकेसाठीच नाही, तर संपूर्ण पश्चिम आशियातील शांततेसाठी एक मोठे आव्हान आहे. जर वाटाघाटींना ‘युद्धाचा भाग’ मानले जात असेल, तर राजनैतिक मार्ग किती काळ टिकतील, हा मोठा प्रश्न आहे. आता सर्वांचे लक्ष व्हाईट हाऊसकडे लागले आहे की, ट्रम्प प्रशासन अझीझी यांच्या या ‘युद्धभूमी’च्या विधानाला कशा प्रकारे उत्तर देते.
Ans: त्यांनी म्हटले आहे की इराण अमेरिकेसोबतच्या चर्चेला 'युद्धभूमीचा एक भाग' आणि 'रणांगणाचा विस्तार' मानतो, जिथे केवळ युद्धाचेच हित पाहिले जाईल.
Ans: इराणने अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही; मात्र राष्ट्रीय हित आणि सुरक्षेच्या आधारावरच यात सहभागी व्हायचे की नाही, हे ठरवले जाईल असे अझीझी यांनी सांगितले आहे.
Ans: इराणने अमेरिकेवर चर्चेच्या नावाखाली बळजबरी, मनमानी आणि 'प्रेशर पॉलिटिक्स' वापरल्याचा आरोप केला आहे.






