Abu Dhabi Discovers a first 3 thousand year old Iron Age cemetery
अबू धाबी: एक मोठी माहिती समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अल-ऐन भागात एक महत्वपूर्ण पुरातत्वीय शोध लागला आहे. यूएई च्या अल-ऐन बागात आयरन एज म्हणजेच लौहयुगातील एक जुनी स्मशानभूमी सापडली आहे. ही स्मशानभूमी 3 हजार वर्षापूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे. यूएईच्या पुरातन वारशाचा एक महत्वाचा भाग म्हणून या स्मनाशानभूमीला मानले जात आहे. यामुळे 3 हजार वर्षापूर्वीच्या काळातील लोकांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अबू धाबीच्या सांस्कृतिक आणि पर्यटने विभागने (DCT) ही शोधमोहीम राबवली होती. या शोधमोहीमेअंतर्गत सुमारे 100 हून अधिक प्राचीन कबरी आणि जमिनीत गाडलेल्या मौल्यवान वस्तूंचा शोध लागला आहे.
या सांस्कृतिक आणि पर्यटने विभागने दिलेल्या माहितीनुसार, स्मशानभूमीमध्ये तांब्याच्या मिश्रधातूंची शस्त्रे, मातीची भांडी, सोन्याची नाणी, मणी, उस्तरे, शंखाच्या बनावटीचे मेकअप कंटेनर आणि पक्ष्यांनी सजवलेल्या एका खास तांब्याचा प्याला अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत. ही स्माशानभूमी अल-ऐनच्या कत्तारा ओएसिसजवळ सापडली आहे. या ठिकाणी भूमिगत खोदकाम सुरु करुन अंडाकृती खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. या खोल्या वस्तू गाडण्यासाठी वापरल्या जात होत्या.
पुरातत्त्वज्ज्ञ तातियाना वैलेंटेने यांनी सापडलेल्या तांब्याच्या प्याल्याला ‘मास्टरपीस’ असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही स्मशानभूमी पूर्वी लुटल्या गेल्या आहेत, परंतु काही महत्त्वाच्या वस्तू अजूनही सुरक्षित आहेत. अल-ऐनच्या परिसरात खलाज नावाची भूमिगत जलव्यवस्था होती. याचा वापर शेतीसाठी केला जात होता. यामुळे हा देश समृद्ध आणि सुसंस्कृत समाजाचे उदाहरण होता असे तातियाना वैलेंट यांनी म्हटले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरातत्व शोधात सापडलेलया काही वस्तू व्यापाराशी संबंधित आहेत. या भागात व्यापारी चळवळ आणि परस्पर संबंध होतो हे स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे हा एक महत्वपूर्ण शोध असल्याचे तातियाना वैलेंट यांनी म्हटले आहे.
पुरातत्व संशोधनकर्त्यांनी आता रेडिओकार्बन डेटिंग आणि डीएनए चाचण्यांच्या साहाय्याने तेथे गाडण्यात आलेल्या लोकांबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे वय, आहार, आरोग्य आणि त्यांचे मूळ स्थान यांचा शोध घेतला जात आहे. वैलेंटे यांनी म्हटले की, “आपण हळूहळू ही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.”
या शोधामुळे यूएईच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग समोर येत आहे आणि भविष्यात या संशोधनामुळे प्राचीन खाडी देशातील जीवनशैलीबद्दल अधिक सखोल माहिती मिळण्याची शक्यता आहे.