Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले जागतिक टॅरिफ सर्वोच्च न्यायालयाने ६-३ च्या बहुमताने बेकायदेशीर ठरवले आहेत. टॅरिफ लावण्याचा अधिकार केवळ संसदेला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 20, 2026 | 10:06 PM
US-India Trade: भारत-अमेरिका व्यापार करार अडचणीत? दौरा पुढे ढकलल्याने वाढला तणाव (फोटो-सोशल मीडिया)  

US-India Trade: भारत-अमेरिका व्यापार करार अडचणीत? दौरा पुढे ढकलल्याने वाढला तणाव (फोटो-सोशल मीडिया)  

Follow Us
Follow Us:

 

  • Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका!
  • Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले
  • टॅरिफ लावण्याचे अधिकार संसदेचेच
Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक अजेंड्याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी विविध देशांतून येणाऱ्या मालावर लागू केलेले ‘टॅरिफ’ (सीमा शुल्क) न्यायालयाने ‘बेकायदेशीर’ ठरवले आहेत. टॅरिफ लागू करण्याची ट्रम्प यांची पद्धत चुकीची असून, त्यांच्या प्रशासनाकडून अधिकारांचा दुरुपयोग झाल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत.

आणीबाणीच्या अधिकारांचा वापर ठरला अवैध

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये व्यापार तूट कमी करण्यासाठी ‘आणीबाणीच्या अधिकारांचा’ वापर करत अनेक देशांवर व्यापक परस्पर टॅरिफ लागू केले होते. १९७७ च्या आणीबाणीच्या कायद्याचा आधार घेत ट्रम्प यांनी ही कारवाई केली होती. मात्र, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ६-३ अशा बहुमताने हा निर्णय फेटाळून लावला. “राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर अशा प्रकारे करणे हे कायद्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारे आहे,” असे न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे.

The Supreme Court of the United States has ruled against President Trump’s power to impose tariffs, declaring that his use of emergency authority to levy broad tariffs on US trading partners was unlawful. pic.twitter.com/J6QolZqci8 — ANI (@ANI) February 20, 2026

डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा

न्यायाधीशांमध्ये मतांतर; पण बहुमत टॅरिफच्या विरोधात

या ऐतिहासिक निकालपत्रात न्यायालयाने आणीबाणीच्या शक्तींच्या दुरुपयोगावर निशाणा साधला आहे. ९ न्यायाधीशांच्या खंडपीठात सॅम्युअल अलिटो, क्लेरन्स थॉमस आणि ब्रेट कवनुघ या तीन न्यायाधीशांनी टॅरिफच्या बाजूने मत व्यक्त करत ‘एक्झिक्युटिव्ह फ्लेक्सिबिलिटी’चे समर्थन केले. मात्र, इतर सहा न्यायाधीशांनी बहुमताने असे स्पष्ट केले की, आयात कर लावण्याचे अधिकार राष्ट्रपतींना अशा प्रकारे बहाल केलेले नाहीत. या निर्णयाने ट्रम्प प्रशासनाचे सर्व कार्यकारी आदेश तात्काळ प्रभावाने अमान्य ठरवले आहेत.

टॅरिफ लावण्याचे अधिकार संसदेचेच

अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी हा निकाल देताना अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली. “टॅरिफ किंवा सीमा शुल्क ठरवण्याचे आणि लागू करण्याचे घटनात्मक अधिकार केवळ अमेरिकन काँग्रेसला (संसदेला) आहेत. राष्ट्रपती आपल्या मर्जीनुसार किंवा आणीबाणीचे कारण पुढे करून असे टॅरिफ लादू शकत नाहीत,” असे रॉबर्ट्स यांनी स्पष्ट केले. या निकालामुळे ट्रम्प यांनी विविध देशांविरुद्ध उघडलेल्या व्यापार युद्धाला कायदेशीर खीळ बसली आहे. ट्रम्प यांच्या या टॅरिफ धोरणामुळे भारत, चीन आणि युरोपीय देशांसोबत अमेरिकेचे व्यापारी संबंध ताणले गेले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने हे टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्यामुळे जागतिक बाजारपेठेत काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेसोबत ऐतिहासिक करार; AI युगात देशाला होणार ‘बंपर’ फायदा

Web Title: Us supreme court rules donald trumps tariff decision illegal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 10:06 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Tariff
  • Trump tariffs
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
2

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
3

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
4

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.