Pahalgam Terror Attack: मगरीचे अश्रू! हिंदूंच्या हत्येवर हळहळतोय बांगलादेश; पहलगाम हल्ल्यावर युनूसच्या देशाचे म्हणणे तरी काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (22 एप्रिल) पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान या हल्ल्याने केवळ भारतच नव्हे तर सपूर्ण जग हादरले आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांकडून प्रतिक्रिया येत आले. दरम्यान बांगलादेशने देखील हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. बांगलादेशने या हल्ल्याला निषेध दर्शवला आहे.
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या अंतरिम सरकारने हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच बांगलादेश दहशतवादविरुद्धच्या जागतिक लढाईसाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. बांगलादेशच्या या विधानानंतर हे दावे पोकळ असल्याचा म्हटले जात आहे. यामागचे कारण बांगलादेशत होत असलेल्या हिंदूविरोधी हिंसाचार आणि त्याविरोधात होत नसलेली कारवाई आहे. यामुळे बांगलादेशची सहानुभूती आणि संवेदना खोट्या असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. या हल्ल्यात निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बांगलादेश मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो.”
तसेच बांगलादेशने असेही म्हटले आहे ती, आम्ही दहशतवादविरुद्धच्या जागतिक लढाईत भारतासोबत आहोत. बांगलादेश पुन्हा दहशतवादविरोधी बचनबद्धता अटळ असल्याचे सांगतो.
Bangladesh condemns Pahalgam Terror Attack.#PahalgamTerroristAttack #JammuAndKashmir pic.twitter.com/yrqSggA7gq
— Ashok Murugan (@ashok_vox) April 23, 2025
याचवेळी पहलगाम हल्ल्यावर जागतिक स्तरावर देखील विरोध केला जात आहे. अमेरिका, रशिया, इस्रायल, इराण, श्रीलंका, नेपाळ आणि यूएईने या हल्ल्याचा तीव्र विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. या कठीण काळात अमेरिका भारतासोबत ठामपणे उभा आहे.
तसेच नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी देखील हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच नेपाळ भारतासोबत खंबीरपणे उभा असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळ सीमेवर देखील कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि नेपाळच्या एका नागरिकाचा समावेश आहे.
दरम्यान हा हल्ला झाला त्यावेळी दहशतवाद्यांनी हल्लेखोरांच्या धर्माची ओळख पटवली आणि त्यांच्यावर हल्ला केला. सध्या जागतिक स्तरावर भारतावरील दहशतवादी हल्ल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.