
फोटो सौजन्य सोशल मीडिया
त्यापूर्वी शुक्रवारी झालेल्या अंतिम दूरचित्रवाणी चर्चेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि देशातील वाढती गुन्हेगारी हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. पहिल्या फेरीतील अटीतटीच्या निकालानंतर आता ब्राझीलची सत्ता कोणाच्या हातात जाणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
४ ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या फेरीच्या मतदानात फ्लाविओ बोल्सोनारो यांनी ४७ टक्के मते मिळवत आघाडी घेतली होती. विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांना सुमारे ४५ टक्के मते मिळाली. मात्र, कोणत्याही उमेदवाराला ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते न मिळाल्याने निवडणूक दुसऱ्या फेरीत गेली. रविवारी होणाऱ्या मतदानात जवळपास १६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना
अंतिम चर्चेत लुला यांनी आपल्या सरकारच्या सामाजिक योजनांचा आणि गरिबी कमी करण्याच्या प्रयत्नांचा बचाव केला. किमान वेतनात वाढ आणि गरजू नागरिकांसाठी राबवलेल्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला. दुसरीकडे, बोल्सोनारो यांनी वाढत्या अन्नधान्याच्या किमती आणि करप्रणालीवरून लुला सरकारला लक्ष्य केले.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपही केले. चर्चेदरम्यान वैयक्तिक टीकेलाही सुरुवात झाली. बोल्सोनारो यांनी लुला यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल नंतर माफी मागितली.
World News : इराणच्या निशाण्यावर अमेरिकन अधिकारी ;अमेरिका ताबडतोब लागली कामाला
या निवडणुकीचा परिणाम केवळ ब्राझीलपुरता मर्यादित राहणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बोल्सोनारो यांच्या राजकीय गटाला पाठिंबा असल्याचे चित्र आहे. बोल्सोनारो विजयी झाल्यास वॉशिंग्टनशी संबंध अधिक जवळचे होण्याची शक्यता आहे.
तर लुला पुन्हा सत्तेत आल्यास चीनसह इतर देशांशी असलेले संबंध कायम ठेवण्यावर भर राहू शकतो. त्यामुळे रविवारी होणारा निकाल ब्राझीलच्या परराष्ट्र धोरणाची दिशाही ठरवू शकतो. आर्थिक स्थैर्य, महागाईवर नियंत्रण आणि गुन्हेगारीला आळा घालण्याची अपेक्षा असलेल्या मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.