फोटो सौजन्य सोशल मीडिया
येणाऱ्या हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या राजनैतिक कार्यालयांतील कर्मचारी संख्या कमी करण्यास सुरवात केली आहे . या निर्णयामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे . इराणने आपली चाल खेळायला सुरवात केली असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत . कारण अमेरिकेला हे माहिती आहे कि मध्यपूर्वेत कुठेही अमेरिकेने लपण्याच्या प्रयत्न केला तरी इराणच्या मिसाईल्स आणि ड्रोन तिथपर्यंत पोहचू शकतात . याचे प्रत्यक्ष अनुभव सुद्धा अमेरिकेने गेल्या काही काळातल्या युद्धात अनुभवले आहेत .
Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना
अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक जे क्लेटर यांनी २३ ऑक्टोबर रोजी परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांना एक निवेदन पाठवले आणि त्यामध्ये इराणच्या संभाव्य कारवायांबाबत गंभीर इशारा दिला . इराणने अमेरिकन कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक वाढवले असून , काही जीवघेण्या कटांनी आधीच कारवाईला सुरवात केल्याचे गुप्तचर माहितीमध्ये सांगितले आहे .
त्याचबरोबर हे टार्गेट्स फक्त मध्य पूर्वेपुरते मर्यादित नसून इतरही काही देशांमध्ये अमेरिकन नागरिकांना लक्ष करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे . मात्र कोणती ठिकाणे आणि व्यक्ती निशाण्यावर आहेत हे अजूनतरी जाहीर करण्यात आलेले नाही .
गुप्तचर विभागाची माहिती मिळताच अमेरिका ताबडतोब कामाला लागली आणि तिने आपल्या कार्यालयांवरील सुरक्षा अजूनच कडक केली केली आहे . सौदी येथील रियाध दूतावास तसेच जेद्दाह , धहरान येथील वाणिज्य दूतावास यामधील अनावश्य्क कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याशिवाय जॉर्डन , लेबनॉन , कतार आणि संयुक्त अरब अमिरातमधील कर्मचारी संख्या कमी केली जात आहे . तरीही या चार देशांमधील दूतावास मर्यदित कामकाजासह सुरूच राहणार आहेत .
इराणसोबतच येमेनमधील हुथींच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे . सौदी अरेबियातील तेल प्रकल्प , विमानतळ आणि इतर महत्वाच्या ठिकाणांना टार्गेट केले जात आहे . सगळ्या आखाती देशांतील सुरक्षा कडक करण्यात आली आहे . डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण चर्चेसाठी तयार न झाल्यास परत जोरदार हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत . त्यामुळे या दोन देशातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे.






