
अमेरिकन परराष्ट्र मंंत्री मार्को रुबियो यांचे मुंबईत आगमन (फोटो सौजन्य - https://x.com/USAmbIndia)
वास्तविक अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचा हा दौरा अशावेळी आखण्यात आला आहे, जेव्हा भारत आणि अमेरिका दीर्घ काळापासून प्रलंबित असणाऱ्या द्विपक्षीय व्यापाराच्या कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहेत. या दृष्टीने मार्को रुबिया यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
आपल्या दौऱ्याच्या दरम्यान मार्को रुबियो दहशतवादांच्या पीडितांनाही श्रद्धांजली देण्यासह गुजरात येथील जामनगर स्थित उर्जा केंद्राचाही दौरा करणार आहेत. या चर्चेत व्यापार कराराला गती देण्यावर, तसेच जागतिक ऊर्जेची गरज आणि रशियाची तेल आयात यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे.
रुबियो संध्याकाळी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या ‘फ्रीडम २५०’ स्वागत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. बुधवारी, ते गुजरातमधील एक महत्त्वाचे ऊर्जा केंद्र असलेल्या जामनगरला भेट देतील.
Thank you, @CMOMaharashtra, for hosting @SecRubio at the iconic Gateway of India. With 500+ American companies operating in Maharashtra and deep investment ties, I look forward to building on this legacy to expand trade, attract investment, and create new opportunities for our people. — Ambassador Sergio Gor (@USAmbIndia) October 20, 2026
त्यांच्या आगमनावेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर आणि रुबियो यांच्या पत्नी जेनेट डॉसडेबेस रुबियो हे देखील उपस्थित होते. त्यांच्या नियोजित कार्यक्रमापूर्वी, रुबियो आणि गोर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेटवे ऑफ इंडियालाही भेट दिली.
सर्जिओ गोर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रुबियो उतरत असल्याचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘मुंबईत परत येऊन खूप आनंद झाला, यावेळी माझे मित्र मार्को रुबियो यांच्यासोबत. आशा आहे की ही भेट फलदायी ठरेल आणि अमेरिका-भारत संबंध अधिक दृढ करेल.’
परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) माहितीनुसार, रुबियो ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील ताज मेमोरियल येथे आयोजित एका समारंभात दहशतवादाच्या बळींना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर, त्याच ठिकाणी ते जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
Ans: मार्को रुबियो हे अमेरिकन परराष्ट्र मंत्री आहेत
Ans: भारतामध्ये ३ दिवस मार्को रुबियो यांचे वास्तव्य असणार आहे
Ans: भारत भेटीदरम्यान मार्को रुबियो एस. जयशंकर यांना भेटणार असून जामनगरलादेखील भेट देणार आहेत