Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव

Afghan Air Strike: पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तियामध्ये केलेल्या कथित हवाई घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून अफगाण संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांवर हवाई हल्ले केल्याचे म्हटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 27, 2026 | 03:17 PM
afghanistan air force retaliates bombs pakistan military bases islamabad abbottabad

afghanistan air force retaliates bombs pakistan military bases islamabad abbottabad

Follow Us
Close
Follow Us:
  • भीषण प्रत्याघात
  • पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य
  • स्थिती चिंताजनक

Afghan Air Force strikes Pakistan military bases 2026 : दक्षिण आशियातील भू-राजकीय नकाशावर आता युद्धाचे ढग केवळ गडद झाले नाहीत, तर प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने (Pakistan Afghanistan air war ) गुरुवारी रात्री अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना अफगाण संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी अत्यंत आक्रमक आणि भीषण प्रत्युत्तर दिले आहे. अफगाण हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी थेट पाकिस्तानी हद्दीत शिरून लष्करी प्रतिष्ठाने, लष्करी वसाहती आणि तळांना लक्ष्य केले असून, या कारवाईने पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे काढले आहेत.

बदल्याची आग: काबूलच्या जखमेवर अफगाणचा प्रहार

अफगाण संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पाकिस्तानने आदल्या रात्री काबूल, कंधार आणि पक्तिका या शहरांवर विनाकारण हवाई हल्ले केले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अफगाण हवाई दलाने शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या धर्तीवर मोठी मोहीम राबवली. अफगाण विमानांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादजवळील फैसलाबाद येथील लष्करी छावणीवर अचूक बॉम्बफेक केली. एवढेच नाही तर नौशेरा, जमरुद आणि ओसामा बिन लादेन मारला गेला होता त्या अबोटाबादमधील लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afg War: ‘असीम मुनीर अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारा…’ सोशल मीडियावर जनतेकडून पाकिस्तानी लष्कराची खरडपट्टी

पाकिस्तानी लष्करी वसाहतींमध्ये घबराट

जमरुद येथील लष्करी वसाहतीत (Military Colony) झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत भागात मोठी घबराट पसरली आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे की, हे सर्व हल्ले अत्यंत यशस्वी ठरले असून यात पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने अद्याप या हल्ल्यातील मृतांचा आकडा जाहीर केला नसला तरी, स्थानिक सूत्रांनुसार लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. इस्लामाबादच्या अगदी जवळ अफगाण विमाने पोहोचल्याने पाकिस्तानच्या रडार यंत्रणेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

🚨 HUGE! Afghan Air Force strikes inside Pakistan. Afghan Taliban Ministry of Defense confirms airstrikes were carried out around 11 am, targeting areas near Faizabad in Islamabad, the cantonment in Nowshera, the military colony in Jamrud, and locations in Abbottabad 💥 pic.twitter.com/wdhS9fznPa — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 27, 2026

credit – social media and Twitter

युद्धाचा नवा अध्याय: ड्युरंड रेषेची मर्यादा संपली?

या हवाई हल्ल्यांनी सिद्ध केले आहे की, अफगाणिस्तान आता केवळ सीमेवर गोळीबार करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. ड्युरंड रेषेचे उल्लंघन करून पाकिस्तानने केलेल्या कुरापतीला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. नौशेरा आणि फैसलाबादमधील लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे संरक्षण कवच भेदले गेले आहे. दोन्ही देशांनी आता एकमेकांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी युद्ध पुकारले असून, या संघर्षामुळे शेजारील देश आणि जागतिक महासत्तांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak Afg War: तालिबानचा ‘सुप्रीम लीडर’ संपला? पाकिस्तानच्या ऑपरेशन गझ्ब-लिल-हकने कंधारमध्ये माजवला हाहाकार

आगामी काळात काय होणार?

सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी आपल्या सीमांवर मोठ्या प्रमाणावर लष्करी कुमक तैनात केली आहे. अफगाण प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी स्पष्ट केले आहे की, जर पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाण भूमीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम आणखी भीषण असतील. दुसरीकडे, पाकिस्तान या धक्क्यातून सावरून मोठा पलटवार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी या संघर्षावर चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांना चर्चेच्या टेबलावर येण्याचे आवाहन केले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या कोणत्या शहरांना लक्ष्य केले?

    Ans: अफगाण हवाई दलाने इस्लामाबादजवळील फैसलाबाद, नौशेरा, जमरुद आणि अबोटाबादमधील प्रमुख लष्करी तळांना आणि वसाहतींना लक्ष्य केले आहे.

  • Que: अफगाणिस्तानने हा हल्ला का केला?

    Ans: पाकिस्तानने आदल्या रात्री काबूल, कंधार आणि पक्तिका या अफगाण शहरांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर (Retaliation) म्हणून ही कारवाई करण्यात आली.

  • Que: या हल्ल्यात किती नुकसान झाले आहे?

    Ans: अफगाण संरक्षण मंत्रालयाने ही कारवाई यशस्वी झाल्याचा दावा केला असून पाकिस्तानची लष्करी प्रतिष्ठाने उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. मात्र, अधिकृत जीवितहानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

Web Title: Afghanistan air force retaliates bombs pakistan military bases islamabad abbottabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Attack
  • Afghanistan-Pakistan Conflict
  • World War 3

संबंधित बातम्या

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान
1

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ
2

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट
3

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट

US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?
4

US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.