Afghanistan Earthquake Death toll crosses 1000 says officals
Afghanistan Earthquake News in marathi : काबूल : अफगाणिस्तानमध्ये रविवारी (३१ ऑगस्ट) झालेल्या भूंकपाने प्रचंड विध्वंस झाला आहे. परिस्थिती बिकट झाली असून तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची याचना केली आहे. मृतांचा आकडा वाढला आहे. अनेक लोक जखमी झाले आहे. आपत्कालीन सेवा आणि वैद्यकीय सेवांच्या कमरतेमुळे परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये १, ४११ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींची संख्या देखील ३,१२४ वर पोहोचली आहे. सध्या तालिबान सरकारने देशाकडून मदतीची मागणी केली आहे. रविवारी रात्री उशिरा ४.२ आणि ५.२ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. याचा सर्वाधिक परिणाम अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतावर झाला आहे. या भूकंपामुळे अनेक लोकांची घरे, तसेच मशीदी पडल्या आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी उशिर होत असल्याने लोकांचा मृत्यू होत आहे.
सुदानमध्ये भूस्खलन; तब्बल 1000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती, दारफूरमधील अख्खं गाव झालं उद्ध्वस्त
अफगाणिस्तानचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे प्रवक्ते युसूफ हम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. परंतु यासाठी कर्मचाऱ्यांची तुट पडत आहे. यामुळे लोकांना बाहेर काढण्यात उशी होत असून मृतांचा आकडा वाढत चालला आहे. सध्या ढिगाऱ्याखाली अडलेल्या लोकांचा शोध घेणे सुरुच आहे.
आम्हाला मदतीची गरज – तालिबान सरकार
दरम्यान हम्मद यांनी माध्यमांशी बोलना आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, आम्हाला मदतीची अत्यंत गरज आहे.. भूकंपामुळे प्रचंड विध्वंश झाला आहे. अनेक लोकांचा बळी गेला आहे. अनेकजण जखमी झाले आहे. शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. हम्मद यांनी सांगितले की, या नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. देश आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची याचना केली आहे.
या देशांनी केली मदत
सध्या भारत, ब्रिटन आणि चीनने मदत केली आहे. भारताने १००० कुटुंबासाठी तात्परुते तंबु उभारले आहे. तसेच अन्नाधान्याचा साठा पाठवला आहे. अजूनही मदत पाठवली जात आहे. ब्रिटनने देखील आपत्कालीन सेवांच्या आणि आरोग्य सेवांची १.३५ दशलक्ष डॉलर्सची मदत पुरवली आहे. तर चीनने आपत्ती निवारणासाठी मदतीची घोषणा केली आहे.
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. ज्या फिरत राहतात. या प्लेट्स सतत एकमेकींवर आदळतात असतात. यामुळे घर्षण तयार होते, दाब तयार व्हायला लागतो. यामुळे प्लेट्स तुटू लागतात आणि ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधत असते. या कारणामुळे भूकंप होतो.
अफगाणिस्तानमध्ये भूकंप का होतात?
अफगाणिस्तान हिंदुकुश पर्वतांमध्ये वसला आहे आणि हिंदुकुश पर्वत अल्पाइन बेल्टचा भाग आहेत. पृथ्वीचा अल्पाइन पट्टा हा भूकंपप्रवण प्रदेशांपैकी दुसरा सर्वात मोठा प्रदेश आहे.
भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते?
भूकंपाची तीव्रता आणि वेळ मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राला सिस्मोग्राफ म्हणतात. या उपकरणाच्या मदतीने पृथ्वीच्या आत होणाऱ्या कंपनांचा आलेख तयार केला जातो. याला भूकंपमापक म्हणतात. या आधारावर, भूकंपाच्या लाटांची तीव्रता, भूकंपाचे केंद्र आणि ऊर्जा रिश्टर स्केलद्वारे शोधली जाते.