Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपानंतर परिस्थिती बिकट; आपात्कालीन आणि वैद्यकीय सेवांचा अभाव (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Afghanistan Earthquake News : रविवारी (३१ ऑगस्ट) अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. या भूंकपाची तीव्रता ४.५ आणि ५.२ रिश्टर स्केल होती. या भूकंपानंतर केवळ २० मिनीटांमध्ये मोठी जीवितहानी झाली. सध्या परस्थिती अधिक बिकट झाली आहे. या भूकंपामुळे काबुल आणि कुनारसह देशाच्या अनेक प्रांतांमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. यामध्ये जवळपास ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
रुग्णालायांमध्येही परिस्थिती बिघडत चालली आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. तसचे मलब्याखाली अनेक लोक अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी अद्याप कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे तालिबाना प्रशासनाने जगभरातून मदत मागितली आहे.
या भूकंपाचा सर्वाधिक परिणाम कुनार प्रांतावर झाला आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की, अचानक झालेल्या स्फोटामुळे त्यांना जाग आली. मात्र अनेकांना आपल्या कुटूंबातील काही सदस्यांना वाचवता आले नाही. अनेक घरांची छते पडली आहेत. यामध्ये अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकून मरण पावले आहेत.
एका रहिवाशाने सांगितले की, त्याला ३ मुलांना वाचवता आले, मात्र घराचे छत कोसळल्यामुळे कुटूंबातील इतर सदस्य त्याखाली ४ तास अडकून राहिले. यामुळे यामध्ये त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
Afghanistan Earthquake: भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, 800 हून अधिक बळी; भारताकडून मदतीचा हात पुढे
शिवाय ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी संसाधनांची कमतरता निर्माण झाली आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी रुग्णालयांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र रुग्णवाहिकांची कमतरतेमुळे अनेक अडचणी येत आहेत. तसेच डॉक्टरांच्या कमतरेतमुळेही रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्ण अजूनही भूकंपाच्या धक्क्यात आहे.
या भूकंपाच्या धक्क्यांनंतरची परिस्थिती बिकट होत आहे. आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी केली जात आहे. यावेळी ब्रिटनने १.३५ दशलक्ष डॉलर्सची मदत केली आहे. UNFPA आणि IFRC द्वापरे अफगाणिस्तानच्या लोकांना आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवांची मदत पुरवली जात आहे. याच वेळी चीननेही आपत्ती निवारणासाठी मदतीची घोषणा केली आहे.
याच वेळी भारताने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने काबुलमध्ये १,००० कुटुंबांच्या मदतीसाठी तात्पुरते निवारे (टेंट) उभारले आहेत. तसेच, १५ टन खाद्य सामग्री काबुल आणि कुनारला पाठवली जात आहे. आजपासून टप्याटप्प्याने इतर मदत पुरवली जाणार आहे.
अमेरिकेने व्हावे सावध! किम जोंग उन चीनच्या दौऱ्यावर रवाना; पुतिनही राहणार उपस्थित