US Iran Conflict : 'युद्ध हाच एकमेव मार्ग...' ; इराण-अमेरिका अणु चर्चेवर इस्रायलचा खळबळजनक दावा, मध्यपूर्व पेटणार? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
इस्रायली अधिकाऱ्याने, इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अटी फेटाळून लावला असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी आता केवळ युद्ध हाच एकमेव मार्ग इराणच्या अणु कार्यक्रमांना नष्ट करण्यासाठी राहिला असल्याचे म्हटले आहे. इस्रायली अधिकाऱ्याने अमेरिकेकडे स्पष्च केले आहे की, आता चर्चेचा कोणताही फायदा नाही. इस्रायलच्या मते इराण अमेरिकेचे ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने आता केवळ युद्ध हाच एकमेव मार्ग राहिला आहे.
परंतु दुसरीकडे इराणने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जिनेव्हा येथे झालेल्या अप्रत्यक्ष चर्चेबद्दल माहिती देताना सांगितले की, दोन्ही देशांमध्ये काही प्रमुख मुद्यांवर सहमती झाली आहे. परंतु अमेरिकेने मध्यपूर्वेत लष्करी तैनात वाढवून इराणवर दबावाचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी देखील अराघची यांनी इराण अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, इराणला केवळ युरेनियमचा साठा समृद्ध करण्यापासून थांबवणे पुरसे नाही, तर त्याच्या सृद्धीककरणासाठी लागणारी यंत्रणा, पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत.
अमेरिकेने मध्यपूर्वेत इराणच्या जवळील कॅरिबियन समुद्रात लष्करी हालचाली तीव्र केल्या आहेत. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकने जगातील सर्वात मोठा विमानवाहू युद्धपोत USS Gerald R. Ford तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प यांनी सुरुवातीपासून इराणवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी अनेकदा वाटाघाटी चर्चा यशस्वी न झाल्यास अमेरिकेकडे लष्करी कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. सध्या इस्रायली अधिकाऱ्याच्या दाव्याने ही शक्यता अधिकच वाढली आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे.
Nuclear Talks : इराणचा मोठा गेम प्लॅन! थेट संयुक्त राष्ट्रासोबत केली हातमिळवणी; अमेरिकेची धडधड वाढली
Ans: इस्रायली अधिकाऱ्याने इराण अमेरिकेचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून चर्चा फिस्कटली असल्याचे म्हटले आहे. इराणने ट्रम्प यांच्या सर्व अटी फेटाळल्या असल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे,
Ans: इस्रायली अधिकाऱ्याच्या मते, इराणशी चर्चा करुन कोणताही फायदा होणार नसून त्यांच्याकडे केवळ युद्ध हाच मार्ग उरलेला असल्याचे म्हटले आहे.
Ans: इराणच्या मते, जिनेव्हा येथे ओमानच्या मध्यस्थीने सुरु असलेली चर्चा यशस्वी झाली आहे. दोन्ही देशांमध्ये काही प्रमुख बाबींवर सहमती झाले असल्याचे इराणने म्हटले आहे. पण याच वेळी त्यांनी अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी हालचालीचा उल्लेख करत त्याला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.






