After becoming president Trump again warns Putin over the Ukraine war
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यांच्या निर्णयांमुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकी प्रचारादरम्यान मध्य पूर्वेतील युद्धावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यांच्याशी भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली होती. आता सत्तेतील पुनरागमानंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुतिन यांनी इशारा दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशिया वाटाघाटी करण्यास तयार नसेल तर त्यांच्यावर निर्बंध लादण्यात येतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे रशियाची चिंता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ते कधीही चर्चेसाठी तयार असल्याचे आणि वैयक्तिकरित्या भेटण्यास तयार आहेत. ट्रम्प यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, खरं तर युक्रे-रशिया युद्ध सुरु व्हायलाच नको होते. या युद्धामुळे लाखो लोकांचा बळी गेला आहे. तेथील परिस्थिती भयानक आहे.
बायडेन प्रशासनावर टिका
डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की,त्यांच्या कार्याकाळात रशिया-युकेन युद्ध सुरु झालेच नसते. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याचे धाडस केले नसते असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेकडे सक्षम राष्ट्रपती नव्हते यामुळे संघर्ष वाढली आणि परिस्थिती बिकट बनली.
युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठ्याचा आढावा
ट्रम्प यांना अमेरिकेच्या युक्रेनला शस्त्रास्त्रा पुरवठ्याच्या संबंधित विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते यासंबंधित आढावा घेत असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, या मुद्द्यावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा सुरु आहे आणि लवकरच ते व्लादिमिर पुतिन यांची देखील भेट घेतली.
युरोपियन युनियवर ट्रम्प यांचा आरोप
दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्पयांनी युरोपियन युनियनवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, युरोपियन युनियनने अमेरिकेपेक्षा युक्रेनला कमी आर्थिक मदत पुरवली आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत २०० अब्ज डॉलर्सची मदत केली आहे. तसेच झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेचा संबंध देत युक्रेनला शांतता प्रस्थापित करायची आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे . मात्र, यासाठी रशियालाने देखील तोडगा काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युक्रेन युद्धावर पुतिन यांची जिनपिंग यांच्याशी चर्चा
पुतिन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी मंगळवारी ( दि. 21 जानेवारी) रोजी व्हिडिओ कॉलवर युक्रेन युद्ध संपंवण्याबाब चर्चा केली. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधांबाबत देखील ते बोलले. याशिवाय दोघांनी रशिया आणि चीनमधील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याचा प्रस्ताव मांडला. क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी रशियाला अमेरिकेशी आदरयुक्त संबंध हवे असल्याचे म्हटले आहे.