फोटोनंतर व्हिडिओही व्हायरल; बेडरुम, बाथरुम अन्..., वाचा Jeffery Epstein च्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Jeffrey Epstein Files : एपस्टाईन फाइल्समुळे पुन्हा खळबळ ; सेलिब्रिटींच्या संबंधाची नवी यादी समोर
याबाबत मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, अमेरिकेचे माजी आणि ४२ वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे देखील नाव समोर आल्याने आणि फोटो रिलीज झाल्याने खळबळ उडाली आहे. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये जेफ्री एपस्टीनच्या खाजगी बेटाबाबत खुलासा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या ओव्हरसाइट समितीच्या डेमोक्रॅटिक सदस्यांनी याबाबत खुलासा केला आहे. बे बेट यूएस व्हर्जिन आयलंडमधील लिटिल सेंट जेम्स आयलंड बाबत सांगण्यात आले आहे. या ठिकाणी जेफ्री अल्पवयीन मुली आणि महिलांना ठेवत असे. या बेटावरुन तो मानवी तस्करी करत असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.
या पुराव्यांमध्ये बेटावरील विविध भागांचे फोटो आणि काही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये बेडरुम, बाथरुन, काही विचित्र खोल्यांचे दृश्य देखील दिसत आहे. याशिवाय भितींवर लावलेले विचित्र मास्क लावलेले दिसत आहे. असे वेगवेगळे अनेक धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ यामध्ये आहेत. या व्हिडिओमधये स्विमिंग पूल, स्टडी रुमचाही समावेश आहे. तसेच एका रुममध्ये पॉवर, धोखा, प्लॉट, पॉलिटिकल असे शब्द लिहिलेले आढळले आहेत. ॉयामध्ये काही महिलांचीही नावे आहे. परंतु गोपनियता आणि सुरक्षेच्या कारणास्तव ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. असे या ओव्हरसाइट समिचीने म्हटले आहे.
🚨 BREAKING: Oversight Dems have received never-before-seen photos and videos of Jeffrey Epstein’s private island that are a harrowing look behind Epstein’s closed doors. See for yourself. We won’t stop fighting until we end this cover-up and deliver justice for the survivors. pic.twitter.com/qXmxFISZLS — Oversight Dems (@OversightDems) December 3, 2025
या दिग्गजांची नावे प्रकरणामध्ये समोर
या प्रकरणाशी संबंधित बिल गेट्स (Bill Gates) , वुडी ॲलन (Woody Allen), नोम चॉम्स्की, सर्गेई ब्रिन आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकेल जॅक्सन, ब्रिटिश सिंगर मिक गेयर अशा या प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर आली आहे. सध्या याबद्दल मोठा वादविवाद सुरु आहे.
pic.twitter.com/gIH2J2waEo — Oversight Dems (@OversightDems) December 3, 2025
राजकुमारी डायना आणि एपस्टिन ‘Date’ वर? लंडनमधील भेटीचा दावा पुन्हा चर्चेत






