After Texas, flash floods hit New Mexico, many people missing, houses washed away, VIDEO
सांता फे : अमेरिकेत सध्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेच्या टेक्सास नंतर आता न्यू मेक्सिकोमध्येही अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम मेक्सिकोच्या रुडोसोच्या डोंगराळ भागात झाला आहे.पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. तसेच अनेक लोक पुरामध्ये अडकले आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
या पूरस्थितीमुळे राष्ट्रीय हवामान सेवेने रुडोसो आणि आसपासाच्या भागात पूर आणीबाणीची घोषणा केली आहे. सध्या या भागात पूरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. सध्या आपत्कालीन आणि बचाव पथक घटनास्थळी लोकांचा शोध घेण्याचे काम करत आहेत. अनेक लोक पूरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु अद्याप कोणत्याही जीवितहानीची पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या तीन लोकांना पूरामधून वाचवण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराचा फटका रिओ रुइडोसो मदीकाठच्या भागांना बसला आहे.स्थानिक वेळेनुसार मंगळवारी ( 8 जुलै) 3 वाजता अचानक नदीच्या पाण्याची पातळी दीड फुटाने वाढली. त्यानंतर काही तासातच पाणी रस्त्यावर वाहू लागले. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे अनेक घरे, वाहने वाहून गेली आहे. राष्ट्रीय हवामान सेवेने पुराच्या धोका अजूनही टळला नसल्याचा इशारा जारी केला आहे. लोकांना ताबडतोब उंच ठिकाणी जाऊन आश्रय घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच वाहतूक सेवाही पूर्णपणे ठप्प झाली आहे.
BREAKING 🚨 MASSIVE flooding is now currently unfolding in Ruidoso, New Mexico. It is sweeping structures away in seconds
Please pray for them 🙏
— MAGA Voice (@MAGAVoice) July 9, 2025
दरम्यान टेक्सामध्येही पूरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस घडला आहे.टेक्सासमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत बचाव पथकाला ८७ मृतदेह सापडले आहे. यामध्ये प्रौढ आणि लहान मुलांचा समावेश आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. टेक्सासमध्ये सहा काऊंटींना पुराचा फटका बसला आहे.
अमेरिकेत दरवर्षी पूरामुळे शेकडो लोक बळी जातात. गेल्या वर्षी पुरामुळे सरासरी १२५ लोकांचा मृत्यू झाला होता. तर सप्टेंबरमध्ये हेलेन चक्रीवादामुळे हाहाकार माजला होता. यामुळे अमेरिकेच्या फ्लोरिडा, जॉर्जिया, कॅरोलिनास, टेनेसी आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. यामध्ये जवळपास २५० लोकांचा मृत्यू झाला होता.