अमेरिकेत गोळीबार (फोटो प्रातिनिधिक आहे, सौजन्य - iStock)
रॉयटर्स, वॉशिंग्टनः अमेरिकेत एका सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जणांना जीव गमवावा लागला असल्याचे वृत्त आहे. कायद्याची अंमलबजावणी करणा-या अधिकाऱ्यासह इतर सात जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी आर्कान्सामधील फोर्डिस सिटी येथील मॅड बुचर या किराणा मालाच्या दुकानात घडली. अर्कान्सास राज्य पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
आरोपीला पोलिस कोठडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या गोळीने हल्लेखोर गंभीर जखमी झाला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. डॅलस काउंटी शेरीफ माइक नोएडल यांनी याबाबत अधिक माहिती दिली, त्यांनी सांगितले की, ही घटना आता नियंत्रणात आणली गेली आहे. राज्य पोलिसांचा हवाला देत KATV ने माहिती दिली आहे की जखमी झालेले कायदा अंमलबजावणी अधिकारी यांच्या जीवाला आता कोणताही धोका नाही.
पीडितांसाठी माझ्या प्रार्थना – राज्यपाल
गव्हर्नर सारा हकाबी सँडर्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पीडितांसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी या मेसेजमध्ये नमूद केले की, ‘कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि जीव वाचवण्यासाठी प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांच्या जलद आणि वीर कृतीबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या प्रार्थना पीडित आणि या भीषण घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आहेत.” दरम्यान फोर्डिस शहर लिटल रॉकच्या दक्षिणेला सुमारे 112 किमी आहे आणि या शहराची लोकसंख्या 3,200 आहे.