Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

America China Relations: ट्रम्प यांचे चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण

डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 12, 2024 | 01:48 PM
America China Relations: ट्रम्प यांचे चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांना शपविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण

America China Relations: ट्रम्प यांचे चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांना शपविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका-चीन संबंधांमध्ये तणाव असताना ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी सी जिनपिंग यांना निमंत्रण दिले होते. मात्र, शी जिनपिंग यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे की नाही, यावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

202 जानेवारी 2025 ला शपथविधी सोहळा

तसेच वॉशिंग्टन येथील चिनी दूतावासानेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा अमेरिकेच्या कॅपिटल हिलवर मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे, जिथे अनेक जागतिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन, जे ट्रम्प यांचे जवळचे मित्र मानले जातात, त्यांनी अद्याप सोहळ्यात सहभागी होण्याबाबत निर्णय घेतलेला नाही.ट्रम्प यांच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, “जागतिक नेते ट्रम्प यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत, कारण त्यांना खात्री आहे की ट्रम्प पुन्हा सत्तेवर येऊन जागतिक शांततेसाठी आपले योगदान देतील.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- होय! AI चॅटबॉटनेच केलं मुलाला जीव घेण्यास प्रवृत्त; आईने कंपनीच्या विरोधात केला गुन्हा दाखल

चीनच्या आयात उत्पादनांवर 100% शुल्क

याचवेळी, ट्रम्प यांनी चीनविरोधी धोरणावर कठोर पाऊले घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर 100% शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. तसेच, चीनच्या टिकटॉक ॲपच्या मालकी हक्काबाबतही कठोर पावले उचलली जातील, अशी सूचक वक्तव्ये केली आहेत. टिकटॉकला 19 जानेवारीपर्यंत अमेरिकेत निर्बंध टाळण्यासाठी कंपनी विक्रीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. सध्या टिकटॉक ही बंदी न्यायालयात आव्हान देत आहे.

तैवानचे समर्थन करणारा अमेरिका

अमेरिका तैवानचा महत्त्वाचा अनौपचारिक पाठीराखा आहे. अमेरिकेकडून तैवानला शस्त्रास्त्र पुरवठा केला जातो, यामुळे तैवानची लष्करी क्षमता वाढत आहे. चीन यावर तीव्र नाराजी व्यक्त करत असून तैवानला इतर देशांपासून अलग करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीन-अमेरिका संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, तैवान व अमेरिका यांचे संबंध अधिक दृढ होत आहेत, तर चीनने आपली नाराजी व्यक्त करत प्रतिकाराची भूमिका घेतली आहे.

ट्रम्प यांचे 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ऐतिहासिक पुनरागमन

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून ऐतिहासिक पुनरागमन केले आहे. त्यांनी 295 इलेक्टोरल मते मिळवून डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. अमेरिकेच्या इतिहासात सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्षपद मिळवणारे ट्रम्प हे ग्रोव्हर क्लीव्हलँडनंतरचे दुसरे नेते ठरले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेत अमेरिका-चीन संबंध कसे बदलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्त्व संपवणार; जाणून घ्या भारतीयांवर काय होणार परिणाम?

Web Title: America donald trump invites chinese president xi jinping to his swearing ceremony nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 01:45 PM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • world
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
1

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
2

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
3

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.