
US H-1B Visa
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने कोणत्याही सूचनेशिवाय अचानक नूतनीकरणासाठीच्या आणि नव्या अर्जदाराच्या व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केल्या आहेत. यामुळे अनेकजण अडचणी सापडले आहे. या सर्व अर्जदारांना 2026 पर्यंतच्या नव्या तारखा देण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासानाने लागू केलेल्या नव्या सख्तीमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. व्हिसाच्या नव्या नियमांनुसार, अर्जदारांची सोशल मीडिया व्हेरिफिकेशन आणि अधिक सखोल तपासणीमुले अनेकांचे 15 डिसेंबरनंतरचे इंटरव्ह्यू रद्द झाले आहेत. ज्युना तारांखावर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही असे अमेरिकेच्या दूतावासाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय एच-1बी व्हिसा व्यावसायिकांना बसला आहे. अनेकजण या आठवड्या सुट्ट्यांसाठी मायदेशी परतले होते, मात्र त्यांचे कामावर परतणे कठीण झाले आहे. कायदेशीर व्हिसा स्टॅम्प नसल्यामुळे लोकांना अमेरिकेत नोकऱ्यांवर परतणे कठीण आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
इमिग्रेशम तज्ज्ञांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया व्हेरिफिकेशन, कडक तपासणी, वाढलेली फी, आणि त्याच्या प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाल आहे, ज्यामुळे भारतीय आयटी क्षेत्रातील लोकांची चिंता वाढली आहे. ह्यूस्टनमधील इमिग्रेशन वकील एमिली न्यूमन यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अपॉइंटमेंट रद्द करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या सर्व परिस्थितीमुळे अमेरिकेत नोकऱ्या करणाऱ्या, अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न, शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. व्हिसा स्थिती पूर्णपणे स्पष्ट होइपर्यंत सध्या भारतीयांना अमेरिकेत प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच सर्वांना सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि कागपत्रे अद्यावत ठेवण्यास भारत सरकारने सांगितले आहे. सध्या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ट्रम्प प्रशासनाचा मोठी कारवाई! तब्बल ८५,००० व्हिसा केले रद्द ; परदेशी विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका
Ans: अमेरिकेने सध्या एच-1बी व्हिसाचे नियम कडक केले आहे. सर्व अर्जांची तपासणी कडक केली जात आहे. तसेच त्यांचे सोशल मीडिया अकाऊंटचे व्हेरिफिकेशनही केले जात आहे. यामुळे सध्या सर्व नूतनीकरण अर्जदारांच्या आणि नव्या अर्जदारांच्या इंटरव्ह्यू अपॉइंटमेंट रद्द करण्यात आल्या आहेत.
Ans: व्हिसा अपॉइंटमेंट रद्द झाल्याने एच-1बी व्हिसा धारकांना 2026 पर्यंत दिलेल्या तारखांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. वैध व्हिसा स्टॅम्प मिळत नाही तोपर्यंत अमेरिकेत प्रवास करता येणार नाही.
Ans: अमेरिकेच्या या व्हिसा नियमांमुळे अनेक भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. विशेष करुन आयटी क्षेत्रातील लोकांची चिंता अधिक वाढली आहे.