Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mehul Choksi ला दिलासा नाहीच; विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला अर्ज, प्रकरण काय?

Canara Bank Loan Default Case : मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मेहुल चोक्सीला मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने चोक्सीचा दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या समन्सविरोधातील अर्ज फेटाळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 03:05 PM
Mehul Choksi

Mehul Choksi

Follow Us
Follow Us:
  • Mehul Choksi ला दिलासा नाहीच
  • विशेष सीबीआय न्यायालयाने चोक्सीचा अर्ज फेटाळला
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Mehul Choksi Money Laundering Case : मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जवळपास ५५ कोटी रुपयांच्या कॅनरा बँकेच्या कर्जाशी संबंधित फसवणूक प्रकरणात दंडाधिकाऱ्यांच्या समन्सविरोधात फरारी आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा (Mehul Choksi) अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी, दंडाधिकाऱ्यांच्या आदेशात कोणतीही अयोग्यता, त्रुटी किंवा बेकायदेशीरता आढळली नसल्याचे नमूद करून त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

हे देखील वाचा : Mehul Choksi Money Laundering Case: मेहुल चोक्सी प्रकरणाला नवा वळण, ईडीने रोहन चोक्सीवर केले गंभीर आरोप

चोक्सीने काय अर्ज केला होता?

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दंडाधिकारी न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणातील आरोपपत्राची दखल घेतली होती. त्यानंतर चोक्सीसह अन्य आरोपींना समन्स बजावले होते. चोक्सीने दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले होते. तसेच, दंडाधिकाऱ्यांनी कोणताही विचार न करता यांत्रिक पद्धतीने आदेश दिला. आरोपपत्राची तपासणी न करताच ते दाखल केले. त्या दिवशीच समन्स काढण्याचा आदेश अत्यंत वेगाने पारित केल्याचा दावाही चोक्सीने अर्जात केला होता.

न्यायालयाची प्रतिक्रिया

कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेश हा न्यायपूर्ण आणि योग्य असल्याचे सीबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच चोक्सीच्या अर्ज फेटाळण्याची मागणी करण्यात आली. यानंतर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांचा आदेश यांत्रिक, संक्षिप्त किंवा कोणताही विचार न करता दिला असल्याचा चोक्सीचा दावा फेटाळण्यात आला आहे. विशेष सीबिया न्यायालयाचे न्याधाशीध जे.पी. दरेकर यांना दंडाधिकाऱ्यांच्या आदेशात कोणत्याही त्रुटी, अयोग्यता किंवा बेकायदेशीरपणा आढळला नाही असे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

सीबीआयच्या दाव्यानुसार, कॅनरा बैंक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने बेझेल ज्वेलरीला एका कन्सोर्टियम करारानुसार अनुक्रमे ३० कोटी आणि २५ कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलाच्या सुविधा मंजूर केल्या होत्या. हे कर्ज सीने आणि हिन्यांनी जडवलेल्या दागिन्यांच्या निर्मिती आणि विक्रीसाठी मंजूर करण्यात आले होते, परंतु, कंपनीने त्याचा वापर निश्चित केलेल्या उद्देशांसाठी केला नाही. कंपनीने कर्जाची परतफेडही केली नाही.

हे देखील वाचा : Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mehul choksi money laundering case special cbi court rejects plea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Mehul Choksi
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.