'भारत अमेरिकवर जितका कर लावेल तितका आम्हीही लावू'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
वॉश्गिंटन: अमेरिकेच नुकतेच विजयी झालेले डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेण्याआधी भारताला मोठी धमकी दिली असून खळबळ उडवली. त्यांनी भारताला परस्पर कर(रेसिप्रोकल टॅक्स) लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी भारतावर आरोप करत म्हटले आहे की, भारत अमेरिकनवस्तूंवर जास्त कर लदतो तसेच अमेरिका देखील भारतीय वस्तूंवर कर लादेल. यामुळे भारत-अमेरिका संबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
भारत अमेरिकवर जेवढा टॅक्स लावतो तेवढाच आम्ही देखील लावू- ट्रम्प
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडामधील मार-ए-लागो येथे एका पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी हे विधान केले. ट्रम्प म्हणाले की, भारताने अमेरिकवर जेवढा टॅक्स लावतो तेवढाच आम्ही देखील लावू. सध्या भारत अमेरिकेच्या अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर आकारतो, पण अमेरिका मात्र त्यांच्यावर तोलामोलाचा कर लावत नाही.
ट्रम्प यांनी हार्ले डेविडसन बाईकच्या आयातीवर लावण्यात आलेल्या कराचे उदाहरण देत म्हटले की, भारत अमेरिकेच्या वस्तूंवर 100 ते 200 टक्के शुल्क लावतो. पण जेव्हा भारत अमेरिकेत सायकल निर्यात करतो, त्यावेळी आम्ही त्यांच्याकडून काहीही शुल्क घेत नाही. ही परिस्थिती बदलली पाहिजे. असे न झाल्यास भारताने जितका शुल्क लावले, तितकाच आम्हीही लावू.”
चीन, कॅनडा आणि मेक्सिको ला कर वाढवण्याची धमकी
ट्रम्प यांनी यापूर्वीही चीनसह इतर देशांवर कर वाढवण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, त्यांनी कॅनडालाही अमेरिकेत होणाऱ्या अनधिकृत स्थलांतर आणि नशेच्या पदार्थांच्या पुरवठ्यावर नियंत्रण आणण्याचा इशारा दिला होता. त्यांनी जस्टिन ट्रुडो यांची त्यांनी भेट देखील घेतली होती. तसेच त्यांनी कॅनडाला अमेरिकेचा भाग बनण्याचा देखील सल्ला दिला होता.
परिषदेतील इतर मुद्दे
भारताव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी गाझा युद्ध आणि युक्रेन-रशिया युद्धाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करून युक्रेन युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गाझातील बंधकांना 20 जानेवारीपर्यंत सोडवण्याची मागणी हमासकडे केली.
ट्रम्प यांची भारताविरोधातील ही भूमिका व्यापार संबंधांवर मोठा परिणाम करू शकते असे तज्ञांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार तणाव वाढण्याची शक्यता असून, जागतिक पातळीवरील आर्थिक धोरणांवरही याचा परिणाम होऊ शकतो