Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Balochistan : ‘असीम मुनीरला पण मादुरोसारखे उचला… ‘; ‘या’ हिंदू बलुच नेत्याने Donald Trump ना केली खास मागणी

Dr. Tara Chand Appeals Donald Trump: अमेरिकेत राहणारे बलुच नेते आणि बलुच अमेरिकन काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तारा चंद यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बलुचिस्तानच्या लोकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 05, 2026 | 04:16 PM
Will Trump take action against Pakistan A Hindu Baloch leader demanded Aseem Munir should be arrested immediately

Will Trump take action against Pakistan A Hindu Baloch leader demanded Aseem Munir should be arrested immediately

Follow Us
Close
Follow Us:
  • बलुच अमेरिकन काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तारा चंद यांनी ट्रम्प यांना आवाहन केले आहे की, व्हेनेझुएलाचे मादुरो आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे सारखेच हुकूमशहा असून मुनीर यांना तात्काळ अटक करावी.
  • व्हेनेझुएलामध्ये ज्याप्रमाणे अमेरिकेने लष्करी कारवाई करून तेथील जनतेला मुक्त केले, तसाच न्याय बलुचिस्तानमधील लोकांनाही मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
  •  असीम मुनीर हे बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्ती चीनला विकून प्रचंड पैसा कमावत असून ते मानवतेविरुद्धचे गुन्हेगार असल्याचा आरोप डॉ. तारा चंद यांनी केला आहे.

Dr Tara Chand Baloch leader Trump appeal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्हेनेझुएलामध्ये केलेल्या धडाकेबाज लष्करी कारवाईनंतर आता पाकिस्तानमध्येही घबराट पसरली आहे. अमेरिकेत राहणारे ज्येष्ठ बलुच नेते आणि बलुच अमेरिकन काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तारा चंद (Dr. Tara Chand) यांनी ट्रम्प यांना एक खळबळजनक पत्र लिहून पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (General Asim Munir) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “ज्याप्रमाणे तुम्ही व्हेनेझुएलाच्या जनतेला हुकूमशाहीतून वाचवले, त्याचप्रमाणे बलुचिस्तानातील लोकांना पाकिस्तानच्या लष्करी जोखडातून मुक्त करा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुनीर आणि मादुरो एकाच नाण्याचे दोन पैलू?

डॉ. तारा चंद यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असीम मुनीर यांची तुलना थेट निकोलस मादुरो यांच्याशी केली आहे. त्यांच्या मते, मादुरो यांनी ज्याप्रमाणे व्हेनेझुएलाची साधनसंपत्ती चीनला लुटू दिली, तसेच काहीसे पाकिस्तानमध्ये सुरू आहे. असीम मुनीर बलुचिस्तानचे सोने, तांबे आणि गॅसचे साठे चीन आणि इतर देशांना विकून स्वतःची आणि लष्कराची तिजोरी भरत आहेत. बलुचिस्तान विधानसभेचे माजी सदस्य राहिलेले डॉ. तारा चंद म्हणतात की, मुनीर हे ‘दुहेरी एजंट’ सारखे वागत असून ते एका बाजूला चीनला मदत करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेची दिशाभूल करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: ड्रॅगनला धडकी! आता अमेरिकेने उघडले इतिहासातील ‘ते’ बंद दरवाजे; दुसऱ्या महायुद्धातील धावपट्ट्या पुन्हा होणार गरम

पाकिस्तानी लष्कराला जागतिक धोका संबोधले

डॉ. तारा चंद यांनी आरोप केला आहे की, असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तानमध्ये दररोज मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे. “बलुचिस्तानमध्ये दररोज निष्पाप लोकांच्या हत्या केल्या जात आहेत आणि हजारो लोक बेपत्ता आहेत. हे मानवतेविरुद्धचे गुन्हे आहेत,” असे त्यांनी नमूद केले. यासोबतच त्यांनी जगाला आठवण करून दिली की ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानी लष्करी तळाजवळच आश्रय मिळाला होता, जे सिद्ध करते की पाकिस्तानी लष्कर हे जागतिक शांततेसाठी सर्वात मोठा धोका आहे.

असीम मुनीर ‘फर्जी’ फिल्ड मार्शल?

काही महिन्यांपूर्वी असीम मुनीर यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती, ज्यावर डॉ. तारा चंद यांनी कडाडून टीका केली होती. त्यांनी मुनीर यांना ‘फर्जी (बनावट) फिल्ड मार्शल’ असे संबोधले असून ते इस्लामच्या नावाखाली जगाला वेठीस धरत असल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला पाठिंबा द्यावा आणि असीम मुनीर यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर उभे करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष

डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात. व्हेनेझुएलामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी ‘रिजीम चेंज’ (सत्तापालट) करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वात अस्वस्थता आहे. जर अमेरिकेने बलुचिस्तानमधील मानवी हक्कांच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली, तर असीम मुनीर आणि पाकिस्तानी सरकारसाठी ते मोठे संकट ठरू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉ. तारा चंद यांनी ट्रम्प यांच्याकडे कोणती प्रमुख मागणी केली आहे?

    Ans: त्यांनी व्हेनेझुएलाच्या निकोलस मादुरो यांच्याप्रमाणेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अटक करून बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.

  • Que: असीम मुनीर यांच्यावर कोणते गंभीर आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: मुनीर बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधने चीनला विकून नफा कमावत आहेत आणि तिथे दररोज निष्पाप लोकांच्या हत्या (Human Rights Violation) करत असल्याचा आरोप आहे.

  • Que: असीम मुनीर आणि मादुरो यांच्यात काय साम्य असल्याचे नेत्याने म्हटले आहे?

    Ans: दोघेही हुकूमशहा असून त्यांनी आपल्या देशाची संपत्ती स्वतःच्या फायद्यासाठी चीनला लुटू दिली आहे, असे डॉ. तारा चंद यांचे म्हणणे आहे.

Web Title: Will trump take action against pakistan a hindu baloch leader demanded aseem munir should be arrested immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • America
  • Asim Munir
  • Donald Trump
  • international news
  • Venezuela

संबंधित बातम्या

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा
1

Saudi Camel Fest: काय सांगता! उंट जिंकला आणि मालकाला मिळालं ‘अख्खं बेट’? वाचा सौदी अरेबियातील ‘या’ अजब बक्षिसाची रंजक कथा

War Alert: ड्रॅगनला धडकी! आता अमेरिकेने उघडले इतिहासातील ‘ते’ बंद दरवाजे; दुसऱ्या महायुद्धातील धावपट्ट्या पुन्हा होणार गरम
2

War Alert: ड्रॅगनला धडकी! आता अमेरिकेने उघडले इतिहासातील ‘ते’ बंद दरवाजे; दुसऱ्या महायुद्धातील धावपट्ट्या पुन्हा होणार गरम

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड
3

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

US Intervention : ‘इराक ते व्हेनेझुएला…’अमेरिकेचा युद्ध घडवण्याचा डर्टी गेम; खळबळजनक अहवालामुळे ट्रम्पची काळी कृत्ये जगासमोर
4

US Intervention : ‘इराक ते व्हेनेझुएला…’अमेरिकेचा युद्ध घडवण्याचा डर्टी गेम; खळबळजनक अहवालामुळे ट्रम्पची काळी कृत्ये जगासमोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.