Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकच्या NSA ची एस. जयशंकर यांनी घेतली भेट; ‘या’ मुद्द्यांवर करण्यात आली चर्चा

भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या त्यांच्या 6 दिवसीय अमेरिकी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, एस. जयशंकर यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक मुद्दे, विविध जागतिक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2024 | 10:43 AM
अमेरिकच्या NSA ची एस. जयशंकर यांनी घेतली भेट; 'या' मुद्द्यांवर करण्यात आली चर्चा

अमेरिकच्या NSA ची एस. जयशंकर यांनी घेतली भेट; 'या' मुद्द्यांवर करण्यात आली चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या त्यांच्या 6 दिवसीय अमेरिकी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, एस. जयशंकर यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक मुद्दे आणि विविध जागतिक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे. 27 डिसेंबर रोजी व्हाइट हाऊसमध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जेक सुलिवन यांची भेट घेतली. या बैठकीत भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीची प्रगती आणि प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींवर विस्तृत चर्चा करण्यात आली.

एस. जयशंकर सोशल मीडिया पोस्ट

एस. जयशंकर यांनी या भेटीबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वॉशिंग्टन डी.सी. येथे अमेरिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्याशी भेटून खूप आनंद झाला. भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीबद्दल आणि वर्तमान प्रादेशिक-जागतिक परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण केली.” ही बैठक भारत आणि अमेरिका द्विपक्षीय संबंधांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- येमेनमधील संघर्षाला नवे वळण; काय असेल इस्त्रायलची नवीन रणनिती? पुढचे युद्धभूमीचे ठिकाण?

Good to meet US NSA @JakeSullivan46 in Washington D.C. this morning.

A wide ranging discussion on the progress of 🇮🇳 🇺🇸 strategic partnership. Also exchanged views on current regional and global developments. pic.twitter.com/RtvTNAlHq7

— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) December 26, 2024


इतर वरिष्ठ सदस्यांशी चर्चा

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या दौऱ्यादरम्यान एस. जयशंकर भारतीय महावाणिज्य दूतांच्या एका महत्त्वपूर्ण परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. त्याचबरोबर, ते अमेरिकी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि बायडेन प्रशासनातील इतर वरिष्ठ सदस्यांशी देखील चर्चा करणार आहेत. ही भेट भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

भारत-अमेरिका धोरणात्मक संबंधांना नवीन उंची

या दौऱ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कारण येत्या काही दिवसांत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे जयशंकर आणि सुलिवन यांच्यात झालेल्या चर्चेमुळे पुढील धोरणात्मक पायाभूत निर्णयांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जयशंकर यांची ही भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबरमधील अमेरिकी दौऱ्यानंतर होत आहे. यामध्ये त्यांनी चौथ्या क्वाड लीडर्स शिखर परिषदेचा भाग घेतला होता.

या बैठका भारत-अमेरिका धोरणात्मक संबंधांना नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न दर्शवतात. अमेरिकी दौऱ्यात द्विपक्षीय चर्चांसोबतच जागतिक मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जागतिक स्तरावर चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

जागतिकघडामोडी संबंधित बातम्या- भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टिन ट्रुड्रोंची डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली; म्हणाले…

Web Title: America india news s jaishankar meets us nsa jake sullivan during their us visit nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 10:43 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • india
  • S. Jaishankar
  • world

संबंधित बातम्या

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव
1

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
2

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
3

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा
4

US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.