Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द

America Shutdown : अमेरिकेत मोठा गोंधळ सुरु आहे. शटडाऊनमुळे अनेक सरकारी सेवा बंद असल्याने कामे रखडली आहेत. तसेच सर्वात जास्त हवाई सेवेवर परिणाम होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 09, 2025 | 12:35 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत १ महिन्यानंंतरही शटडाउन कायम
  • हवाई सेवेवर मोठा परिणाम
  • हजारो उड्डाणे रद्द झाल्याने इतर देशांवरही परिणाम

America Shutdown News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये (America) सध्या सरकारी कामकाज ठप्प झाल्याने मोठा गोंधळ सुरु आहे. अमेरिकेचे फंडिग बिल पास न झाल्याने १ ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे. यामुळे लाखो कर्मचारी विना वेतन सुट्टीवर आहेत. तर काही महत्त्वपूर्ण सेवा सुरु आहेत, परंतु कर्मचाऱ्यांना अद्याप पगार मिळालेला नाही. याचा सर्वात जास्त परिणाम अमेरिकेच्या हवाई सेवेवर झाला आहे.

America Shutdown : शटडाऊनमुळे अमेरिकेत बिकट परिस्थिती; SNAP योजनेवर तात्पुरत्या स्थगितीमुळे सामान्यांचे हाल

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम

अमेरिकेच्या हवाई सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून हजारो उड्डाणे रद्द झाले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याचा अमेरिकेच्या उद्योगावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, १०% पर्यंत आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे.

शनिवारी दुपारी १३० हून अधिक उड्डाणे शार्लोट विमानतळावरुन रद्द करण्यात आली आहे. अटलांटा, शिकागो, डेन्व्हर, आणि न्यूजर्सीमधील नेवार्क विमानतळावर मोठा गोंधळ उडाला आहे.

अमेरिकेच्या विमानतळांवर परिणाम

सध्या शटडाउनमुळे अमेरिकन कर्मचारी पगाराशिवाय काम करत आहेत. परंतु बरेच कर्मचारी रजेवर असल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे न्यूयॉर्कसह अनेक विमानतळांवरली उड्डाणे रद्द किंवा विलंबित करण्यात आली आहे. जर शटडाउन असेच सुरु राहिले तर हवाई वाहतूक सेवेवर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

या देशांवरही अमेरिकन शटडाउनचा परिणाम

अमेरिकेच्या या शटडाउनचा परिणाम केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही. यामुळे अमेरिकेत लष्करी तळांवर कार्य करणाऱ्या युरोपीयन देशातील कर्मचाऱ्यांवरही होत आहे. इटली, पोर्तुगाल, आणि अनेक ठिकाणी हजारो कर्मचारी पगाराशिवाय काम करत आहेत. शिवाय उड्डाणे रद्द झाल्याने अनेक हवाई प्रवाशांसाठी आणि व्यापारासाठी आव्हानात्मक ठरत आहे.

अमेरिकेच्या SNAP योजनेवर परिणाम

अमेरिकेच्या शटडाऊनमुळे याचा सामान्य. जनतेवरही मोठा परिणाम होत आहे. यामुळे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने SNAP (Supplemental Nutrition Assistance Program) म्हणजेच अन्नधान्य सहाय्य योजनेच्या निधी वितरणाला तात्पुरती स्थिगती दिली आहे. परंतु यामुळे लोकांना रोजच्या अन्नासाठी धडपड करावी लागत आहे.

का सुरु आहे शटडाऊन? 

या शटडाउनमागे मुख्य कारण म्हणजे हेल्थ केअर सबसिडीवरील रिपल्बिकन आणि डेमोक्रॅट्स मधील मतभेद आहे. डेमोक्रॅट पक्षाने या हेल्थ केअर सबसिडीत वाढ करण्याची मागणी केली आहे, मात्र ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने याला नकार दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मते, सबिसिडी वाढवल्यास सरकारचा खर्च वाढेल आणि याचा इतर विभागांवर विपरित परिणाम होईल.

America Shutdown : ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटडाऊनमुळे तब्बल ‘इतक्या’ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या शटडाउनचा काय परिणाम होत आहे?

    Ans: अमेरिकेतील शटडाऊनमुळे अमेरिकेच्या हवाई वाहतूक सेवेवर मोठा परिणाम होत आहे.

  • Que: अमेरिकेत गेल्या दोन दिवसांत किती उड्डाणे रद्द करण्यात आली.

    Ans: अमेरिकेत गेल्या दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

  • Que: अमेरिकेच्या शटडाउनचा परिणाम कोणत्या देशांवर झाला आहे?

    Ans: अमेरिकेच्या शटडाउनचा परिणाम इटली, पोर्तुगाल, आणि आसपासच्या देशांवर जिथे अमेरिकन हवाई सेवा कार्यरत आहे अशा ठिकाणी झाला आहे.

Web Title: America thousands of flights canceled in two days due shutdown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?
1

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या दौऱ्यावर ; भारत-आफ्रिकेतील भागीदारी मजबूत करण्याचा उद्देश
2

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या दौऱ्यावर ; भारत-आफ्रिकेतील भागीदारी मजबूत करण्याचा उद्देश

Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप
3

Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप

तुर्कीची आता खैर नाही! भारताच्या ‘या’ मित्र देशाने आखली राफेल खरेदीची योजना; एजियान सागरात पेटणार युद्ध?
4

तुर्कीची आता खैर नाही! भारताच्या ‘या’ मित्र देशाने आखली राफेल खरेदीची योजना; एजियान सागरात पेटणार युद्ध?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.