America VS China, who will be more powerful in space Golden Dome or Dragon Army
अलीकडच्या तांत्रिक युगातील बदलामुळे जगात अनेक मोठं मोठे बदल घडून आले आहेत. जग संशोधान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मंगळवार जाऊन पोहोचला आहे. अगदी अवकाशात मानवाच्या राहण्यायोग्य जागा आहे का यावरही संशोधन केले जात आहे. यासाठी अनेक देशांनी अवकाशात केंद्र उभारली आहेत. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील काही देश अवकाशात शस्त्र बेस देखील तयार करत आहे. अनेक देशांमध्ये यासाठी स्पर्धा सुरु आहे. यामध्ये विशेष करुन चीन आणि अमेरिका आघाडीवर आहेत. दोन्ही देश एकमेकांना मागे टाकण्यासाठी अवकाशात शस्त्र केंद्र उभारत आहे.
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्डन डोम ची घोषणा केली आहे. हे डोम इस्रायलच्या आयर्न डोम प्रमाणे ताकदवर आणि ड्रॅगन आर्मीला टक्कर देणारे असणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आज आपण हे जाणून घेऊयात की, अवकाशात कोणाचे वर्चस्व भारी असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्डन डोम ही अंतराळ सुरक्षा योजना तयार केली आहे. यासाठी २५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूकही करण्यात आली आहे. या योजनेचे उद्दिष्ट अमेरिकेचे हायपरसोनिक आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपासून बचाव करणे आहे. ही क्षेपणास्त्रे अंतराळात कैनात केली जाणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले आहे की, इस्रायलच्या आयर्न डोमवर आझारित हे अमेरिकेचे सुरक्षा कवच गोल्डन डोम असणार आली. हे २०२९ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे चीनचे ड्रॅगन सैन्य गेल्या ३० वर्षापासून अस्तित्वात आहे. हे सैन्य अमेरिकेविरोधत सतत रणीनीतच्या योजना आखत असते. एकीकडे अमेरिकेचे गोल्डन घुमट तर दुसरीडे आग ओकणारा ड्रॅगन असे युद्ध सुरुच असणार आहे. एकीकडे चीनकडे ऑर्बिटल अँटी-सॅटेलाईट शस्त्र, जॅमिंग यंत्रणा, डायरेक्ट-असेंट क्षेपणास्त्रांसारखी अत्याधुनिक साधने आहेत. ही साधने अमेरिकेच्या उपग्रहांवर हल्ला करु शकतात. तसेच चीनकडे शेकडो स्पाय सॅटेलाट्स आहेत जे अमेरिकेच्या उपग्रहांवर हल्ला करु शकते. तसेच चीनकडे हाय-टेक प्रणालीचे लेझर आणि अँटी-सॅटेलाईट क्षेपणास्त्र देखील आहे.
दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०२७ पर्यंत पीपल्स लिबरेशन आर्मीला तैवानवर ताबा घेण्याचे निर्देश दिले आहेत. अशा वेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्डन डोम घोषेनंतर चीन-अमेरिका युद्ध जमिनीपातळवर न राहत अंतराळतही उफाळून येईल.
हे लक्षात घेता अमेरिकेने आपली तयारी सुरु केली आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशानाच्या मते, “गोल्डन डोममुळे शत्रू देशांचे हल्ले हवेतच हाणून पाडण्यात शक्य होणार आहे.यासाठी अमेरिका सज्ज राहण्याच्या तयारीत आहे.
सध्याच्या घडीला चीनचे अंतराळातील वर्चस्व बळकट आहे, पण अमेरिकेचे गोल्डन डोम यशस्वीरित्या अंतराळात तैनात झाल्यास दोन्ही देश एका पातळीवर येतील. यामुळे अंतराळात दोन महासत्ता देशात स्पर्धा सुरु होईल. आता यामध्ये कोण वरचढ असेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.