Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flight 2398: हवेत लॅपटॉपचा भडका, केबिनमध्ये काळा धूर अन् 5 प्रवासी भाजले; अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात थरारक घटना

Laptop Fire Accident: अमेरिकेत विमान उतरत असताना एका लॅपटॉपला आग लागली, ज्यामुळे विमानाच्या केबिनमध्ये धूर पसरला. वैमानिकाच्या म्हणण्यानुसार, अंदाजे चार ते पाच प्रवाशांचे हात गंभीररित्या भाजले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 23, 2026 | 02:39 PM
A laptop caught fire while the plane was landing sending smoke into the American Airlines cabin and burning several passengers

A laptop caught fire while the plane was landing sending smoke into the American Airlines cabin and burning several passengers

Follow Us
Follow Us:
  • लँडिंगदरम्यान अचानक भीषण अपघात
  • प्रवासी भाजले व मोठी घबराट
  • केबिन क्रूचे शौर्य अन् मोठा अपघात टळला

अमेरिकेतील (America) हवाई प्रवासादरम्यान एका विमानामध्ये अत्यंत थरारक आणि धडकी भरवणारी दुर्घटना घडली आहे. अटलांटाहून डॅलसच्या दिशेने प्रवास करणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात लँडिंगची प्रक्रिया सुरू असतानाच एका प्रवाशाच्या लॅपटॉपला अचानक भीषण आग लागली. लॅपटॉपमधून निघणाऱ्या ज्वालांमुळे आणि विषारी काळ्या धुरामुळे काही क्षणातच संपूर्ण विमानाच्या केबिनमध्ये अंधार आणि गुदमरवणारी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे विमानात बसलेल्या १३३ प्रवाशांमध्ये प्रचंड पळापळ आणि घबराट पसरली. या आगीच्या थेट संपर्कात आल्यामुळे सुमारे ४ ते ५ प्रवाशांचे हात गंभीररीत्या भाजले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट २३९८ हे एअरबस ए३२१ (Airbus A321) विमान अटलांटाहून उड्डाण करून डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावर (DFW) उतरण्याच्या तयारीत होते. लँडिंगला अवघे काही मिनिटे शिल्लक असतानाच विमानाच्या मागील भागात बसलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतील किंवा हातातील लॅपटॉपमधून अचानक तीव्र धूर निघू लागला अन् क्षणार्धात त्याने पेट घेतला. आगीची तीव्रता एवढी जास्त होती की, धुरामुळे प्रवाशांना श्वास घेणे कठीण झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आणि घाबरून बाजूला होण्याच्या गडबडीत ४ ते ५ प्रवाशांचे हात भाजले.

पायलटचा मे-डे मेसेज अन् केबिन क्रूचे शौर्य

विमानात आग लागताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्काळ डॅलस विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी (ATC) संपर्क साधला आणि विमानात आग लागल्याची आणीबाणीची माहिती दिली. “विमानाच्या मागील भागात आग लागली असून काही प्रवासी भाजले आहेत,” असा आणीबाणीचा संदेश पायलटने जमिनीवरील नियंत्रण कक्षाला दिला. पायलटने धावपट्टीवर तातडीने आपत्कालीन वैद्यकीय पथके आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तैनात करण्याची विनंती केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral News: बालीमध्ये हिंदू सणाचा अवमान करणाऱ्या पर्यटकाला 1 वर्षाचा तुरुंगवास; सोशल मीडियावर व्हायरल ‘तो’ वादग्रस्त VIDEO

दरम्यान, विमानाच्या आत उपस्थित असलेल्या फ्लाइट अटेंडंट्सनी अत्यंत धैर्याने आणि तत्परतेने काम केले. हवाई सुरक्षेसाठी विमानात ठेवण्यात आलेल्या विशेष अग्निरोधक ‘थर्मल कंटेनमेंट बॅग’चा (Thermal Containment Bag) वापर करून क्रू मेंबर्सनी जळणारा लॅपटॉप सुरक्षितपणे त्या बॅगमध्ये सील केला. त्यानंतर लॅपटॉप विमानाच्या मध्यवर्ती भागात आणून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. केबिन क्रूच्या या प्रसंगावधानाने एका मोठ्या विमान अपघाताचा धोका टळला.

धावपट्टीवर आपत्कालीन मदत अन् प्रवाशांची सुटका

विमानाचे डॅलस विमानतळावर सायंकाळी सुमारे ६:५५ वाजता सुरक्षित लँडिंग झाले. विमान धावपट्टीवर उतरताच तेथे आधीच तयार असलेल्या वैद्यकीय आणि अग्निशामक पथकांनी विमानाला वेढा घातला. आगीमध्ये भाजलेल्या आणि धुरामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांवर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश प्रवाशांना विमानातच वैद्यकीय मदत देऊन सोडण्यात आले, तर एका गंभीर बाधित प्रवाशाला अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते, ज्याला उपचारांनंतर सुखरूप घरी सोडण्यात आले आहे.

या भयानक अनुभवाबद्दल सांगताना एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, “आम्ही लँडिंगची वाट पाहत होतो आणि अचानक मागच्या बाजूने आरडाओरडा सुरू झाला. काही सेकंदातच काळा धूर आमच्या चेहऱ्यावर आला आणि श्वास कोंडू लागला. तो क्षण अत्यंत भयावह होता, परंतु विमान कर्मचाऱ्यांनी परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

लिथियम-आयन बॅटरीचा धोका: ‘थर्मल रनअवे’ म्हणजे काय?

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) या अमेरिकन हवाई वाहतूक नियामक संस्थेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. एफएएच्या आकडेवारीनुसार, २०२६ मध्ये आतापर्यंत विमानांमध्ये लिथियम बॅटरीशी संबंधित सुमारे ५८ आगीच्या आणि धुराच्या घटनांची नोंद झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, मोबाईल, लॅपटॉप आणि पॉवर बँकमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन (Lithium-ion) बॅटरीमध्ये जास्त उष्णता निर्माण झाल्यास ‘थर्मल रनअवे’ (Thermal Runaway) ही रासायनिक प्रक्रिया घडते.

बॅटरी खराब झालेली असल्यास, शॉट सर्किट झाल्यास, किंवा तिच्यावर अवाजवी दाब आल्यास ही प्रक्रिया अचानक सुरू होते, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होतो किंवा तिला भीषण आग लागते. याच कारणामुळे सर्वच आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या प्रवाशांना लिथियम बॅटरी असणारी उपकरणे चेक-इन बॅगेजमध्ये न ठेवता हँड बॅगेजमध्ये (केबिनमध्ये) आणण्याचे आवाहन करतात, जेणेकरून आग लागल्यास ती कर्मचाऱ्यांच्या तातडीने लक्षात येऊ शकते. या घटनेने हवाई प्रवासातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आणला आहे.

Web Title: American airlines flight 2398 laptop fire dallas emergency landing marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • America
  • laptop
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Privacy Fine : टिकटॉकला मोठा दणका! भरावा लागणार 3300 कोटींचा दंड, लहान मुलांच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड? प्रकरण काय?
1

TikTok Privacy Fine : टिकटॉकला मोठा दणका! भरावा लागणार 3300 कोटींचा दंड, लहान मुलांच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड? प्रकरण काय?

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
2

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
3

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
4

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.