Americas F-35 Fighter jet plane Crash video viral
F-35 Fighter Jet Crash : वॉशिंग्टन : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे F-35 लढाऊ विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान जगातील सर्वात प्रगत आणि शक्तीशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. याचा अमेरिकेला खूप अभिमानही आहे. गेल्या काही काळात या विमानाची जगभर चर्चा सुरु होती. मात्र या विमानाचा मोठा भयंकर अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे F-35 लढाऊ विमान अलास्कामध्ये कोसळले होते. २८ जानेवारी रोजी फेअरबँक्समधील आयल्सन हवाई दल तळावर हा भीषण अपघात झाला होता. याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की विमान जमिनीवर कोसळताच्या आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले आहे.
विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने विमान वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. वैमानिकाने विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी जवळपास ५० मिनिटे हवेतून अभियंताशी कॉल सुरु होती. परंतु सर्व प्रयत्न अपयशी ठरले. वैमानिकाने विमानातून पॅराशूटच्या मदतीने उडी मारली आहे. त्यानंतर विमान हवेतच पंतगासारखे उडत होते. ते अचानक जमिनीवर कोसळले आणि भीषण आग लागली. विमानाचा मोठा स्फोट झाला.
याच वेळी एक मालवाहू विमानही घटनास्थळी उपस्थित होते. सुदैवाने या विमानाचा कोणताही अपघात झाला नाही. F-35 या विमानापासून लांब अंतरावर पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियवर धुमाकूळ घालत आहे.
पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर होणार रवाना; भारत-जपान आर्थिक संबंधास मिळणार नवी गती
JUST IN: F-35 fighter jet crashes at Eielson Air Force Base in Alaska. The pilot survived pic.twitter.com/zEuPNY8jqk
— BNO News (@BNONews) January 29, 2025
CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, लढाऊ विमानाच्या पुढील भागात हायड्रॉलिक लाईन्समध्ये आणि लॅंडिग गियरमध्ये बर्फ साठला होता. यामुळे विमानात उडताना अडथळे येत होते. यामुळेच हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, वैमानिकाने लॅंडिग गियर मागे घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे आढळून आले.
या अपघाताच्या ९ दिवसानंतर दुसऱ्या एका लढाऊ जेटमध्येही हिच समस्या अधिकाऱ्यांना आढळून आली होती. पण सुदैवाने विमान सुरक्षितपणे खाली उतरले.
लॉकहीड मार्टीन या अमेरिकेच्या संरक्षण उत्पादन कंपनीने F-35 लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे. या विमानाची किंमत २०२० मध्ये सुमारे $१३५.८ दशलक्ष होती. सध्या यची किंमत $८१ दशलक्ष पर्यंत घसरली आहे.
भारतीयांसाठी H1-B व्हिसा होणार बंद? जाणून घ्या काय म्हणाले अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर