पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर होणार रवाना; भारत-जपान आर्थिक संबंधास मिळणार नवी गती (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India Japan News in marathi : नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) २ दिवसांच्या जपान (Japan) दौऱ्यावर जाणार आहे. गुरुवारी (२८ ऑगस्ट) संध्याकाळी ते जपानासाठी रवाना होतील. या दरम्यान पंतप्रदान मोदी जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान मोदी १५ व्या भारत-जपान वार्षिक परिषदेसाठी दौऱ्यावर जाणार आहे. हा पंतप्रधान मोदींचा आठवा जपान दौरा असेल.
तसेच या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी इशिबा शिगेरु यांच्यासोबत भारत-जपान शिखरपरिषेदत सहभागी होती. तसेच या भेटीदरम्यान भारत आणि जपानमधील धोरणात्मक संबंध आणि जागतिक भागीदारीवर चर्चा होणार आहे. यात संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि लोकांमध्ये देवणा-घेवाणीवर चर्चा होईल. तसेच दोन्ही देशांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही चर्चा केली जाणार आहे. २९ ते ३० ऑगस्टपर्यंत हा दौरा असेल.
“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा
मीडिया रिपोर्टनुसार, या भेटीदरम्यान भारत आणि जपानमधील व्यापार संबंधावर भरदिला जाणर आहे. यावेळी जपान सरकारने भारतामध्ये १० ट्रिलियन येन अमेरिकन डॉलरमध्ये ६८ अब्ज गुंतवणूक करण्यची शक्यता आहे. जपानच्या क्योडो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी आणि इशिबा संयुक्त निवदेनात याची घोषणा करु शकतात. यापूर्वी २०२२ मध्ये जपानचे माजी पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी भारतात ५ ट्रिलियन गुंतवणूकीची घोषणा केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या भारत आणि जपानचे आर्थिक संबंध अधिक मजबूत होणार आहेत. यामध्ये अधिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. यामध्ये खनिजे आणि सेमीकंडक्टर्स क्षेश्रांमध्येही दोन्ही देश सहकार्य वाढवण्यावर भर देणार आहेत. पंतप्रधान मोदी जपानच्या सेमीकंडक्टर कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सेंडाई शहराला देखील पंतप्रधान मोदी भेट देण्याची शक्यता आहे.
तसेच भारत आणि दपानमध्ये स्टार्टअप्स तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेश्रातील स्टार्टअप्ससाठी AI प्रकल्पाची घोषणा होईल. याचा उद्देश जपानी कंपन्यांना भारतीय कंपन्यांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणे आहे. यामुळे जपानी अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! आता अर्जेंटिनाचा प्रवास झाला सोपा; विना व्हिसा मिळणार प्रवेश, पण…