
Protest against ICE in California
अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याच्या गोळीबारात एक महिला ठार, VIDEO
गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्या बेकायदेशीर नागरिकांना देशातून हद्दपार करण्याच्या निर्णयानंतर ICE अधिक सक्रिय झाले असून परदेशी अवैध पद्धतीने राहणाऱ्या नागरिकांना अटक करत आहे. परंतु त्याच्यावर जबरदस्ती केली जात आहे, गोळीबार केला जात आहे. यामुळे कॅलिफोर्नियाने यावर संताप व्यक्त केला आहे. गेल्याच आठवड्यात एका महिलेला ICE अधिकाऱ्याने गोळीबार करुन ठार केले गोते. तसेच एका गरदोर महिलेला जबरदस्तीने जमिनीवर पाडत तिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अशा प्रकारची कारवाई अनावश्यक आणि मानवीय हक्कांच्या विरोधात असलेल्याचे लोकांनी म्हटले आहे.
शिवाय अनेक वेळा गोळीबार करण्यात आला असून यानध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात रेनी गुड नावाच्या महिलेला ठार करण्यात आले होते. तिच्या पाश्चात्य तीन मुले, तर दुसरीकडे पोर्टलँडमधील गोळीबारतही अनेकजण जखमी झाले होते. या घटनांममुळे अमेरिकन नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. तसेच लोक ट्रम्प प्रशासनाच्या या कारवाईलाही तीव्र विरोध करत आहेत. सध्या कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर हजारो लोक उतरले आहेत. याशिवाय लॉस एंजलिसमध्येही सिटी हॉलच्या बाहेर ५०० हून अधिक लोकांनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहेत. निदर्शनकर्त्यांनी, नो ICE, ICE OUT, नो फासिस्ट अमेरिका अशा घोषणा देत प्रवासी समुदायाच्या हक्कांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
In California, residents openly took to the streets against ICE actions. People report pressure and abuse. Public anger has spilled into the streets. pic.twitter.com/L70QrAucUR — Venkat ⚡️ (@WealthArigato) January 10, 2026
2025 पासून सुरु कारवाई
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरवातीला बेकायदेशीरपण देशात राहणाऱ्यांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयानंतर आतापर्यंतच्या काळात जवळपास सुमारे ६ लाख २२ हजार लोकांना डिपोर्ट करण्यात आले. तसेच ICE अधिकाऱ्यांच्या कारवाई ३२ जणांचा मृत्यू झाला आहेत. अमेरिकेच्या या कारवाईला देशांतर्गत तीव्र विरोध होत आहे. तसेच मानवाधिक संघटनांनी देखील याला तीव्र विरोध केला आहे.
Ans: ICE च्या कारवाईदरम्यान मृत्यू, गोळीबाराच्या घटना आणि प्रवासी समुद्यांवर कठोर कारवाईमुळे नागिरक संतापले आहेत. यामुळे ICE विरोधात हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत.
Ans: कॅलिफोर्नियाच्या नागरिकांनी ICE एजन्सी बंद करण्याची, प्रवासी आणि नागरिकांचे हक्क सुरक्षित करण्याची. तसेच कायदा अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.