अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याकडून गोळी झाडून महिलेची केली हत्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दरम्यान संघीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन कारवाईदरम्यान संबंधित महिलेने अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. यामुळे स्वसंरक्षणासाठी तिच्यावर गोळीबार करण्यात आला. परंतु ICE अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे मिनियापोलिसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रैनी गुड अशी या ठार झालेल्या महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. सध्या या घटनेमुळे मिनियापोलिसमध्ये तणावाचे वातावरण आहे.
दरम्यान मिनियापोलिसमध्ये सध्या ट्रम्प प्रशासनाच्या या कारवाईविरोधात तीव्र संताप उफाळला आहे. शहराचे महापौरांनी ICE अधिकाऱ्याचे महिलेच्या हत्येचे कृत्य हे बेपर्वा आणि अनावश्यक असल्याचे म्गटले आहे. मिनियापोलिसच्या निवासी भागात ही घटना घडली आहे. महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.
दरम्यान या घटनेनंतर यूएस डिपोर्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS)च्य प्रवक्त्या यांनी या घटनेचा तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. तसेच या घटनेचा एक सीटीव्ही व्हिडिओ देखील सोशल मीडियाव पाहयला मिळत आहे.
दरम्यान या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, मी नुकतेच मिनियापोलिसमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ खूप भयानक आहे. महिलेने अधिकाऱ्यांवर हल्ला केलेले स्पष्ट दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या कामात तिने अडथला आणल्याने तिला रोखण्याचा प्रयत्न करण्या आला. अधिकाऱ्याने स्वरंक्षणार्थ गोळीबारा केला असल्याचा ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या विधानानंतर इमिग्रंट लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या कारवाईला तीव्र विरोध केला जात आहे.
यापूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी एका गर्भवती महिलेला जमिनीवर दाबले होते. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनांमुळे सध्या अमेरिकेच्या इमिग्रेशन कामकाजावार प्रश्न उपस्थित केले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा तणावपूर्ण संघर्ष रोखण्याचा आणि महिलेचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे.
BREAKING: ICE Officer shoots and kills woman in Minneapolis during a federal immigration operation. pic.twitter.com/Ifn0u4BAY3 — Daily Loud (@DailyLoud) January 7, 2026
अमेरिकेत ‘मास’ डिपोर्टेशन! २०२६ मध्ये लाखो प्रवाशांना दाखवणार बाहेरचा रस्ता; ट्रम्पचा इशारा






