Ant-agonistic aggressive tapinoma magnum ants threaten Germany’s infrastructure
बर्लिन: तुम्ही मुंगी आणि हत्तीची गोष्ट तर नक्कीच ऐकली असेल, जिथे एक मुंगी हत्तीच्या सोंडते घुसून त्याला सडो कि पळो करुन सोडतो. हत्तीचा स्वत:ला महान समजण्याचा अहंकार मोडून काढते. दरम्यान असेच काहीसे जर्मीनीत घडले आहे. टॅपिनोमा मॅग्नम या आक्रमक आणि परदेशी प्रजातीच्या मुंग्यांमुळे जर्मनीत मोठा गोंधळ उडाला आहे. या मुंग्यांमुळे देशात वीज पुरवठा, इंटनेट सेवा बंद पडली आहे. मुंग्यांची ही टॅपिनोमा प्रजाती ही मुळत: भूमध्यसागरी भागात आढळते. परंतु सध्या उत्तर जर्मनीत ही प्रजाती मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
कार्लस्रुहे येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे कीटकशास्त्रज्ञ मॅनफ्रेड व्हेर्हाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅपिनोमा प्रजातीच्या प्रचंड मुंग्या सुपर कॉलिनी बनवतात. सामान्य मुग्यांच्या प्रजातींपेक्षा या मुग्यां आकाराने मोठ्या असतात. तसेच या मुग्यां अधिक आक्रमक देखील असतात. सध्या या मुग्यांची टॅपिनोमा प्रजाती कोलोन आणि हॅनोव्हर सारख्या उत्तरेकडील शहरांमध्ये पसरत आहे. यामुळे या शहरांमध्ये वीज आणि इंटरनेट सेवा स्थगित झाल्या आहेत.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, टॅपिनोमा प्रजातीच्या मुंग्या विशेष करुन बाडेन-वुटमबर्ग आणि आसपासच्या भागात आपल्या वसाहती तयार करत आहेत. किहाल नावाच्या शहरात या मुंग्यांमुळे वीज आणि इंटरनेट सेवा विस्कशीत पडली आहे. तसेच फ्रान्स आणि स्वित्झर्लंडसारख्या युरोपीय देशांमध्ये या मुंग्यांनी गोंधळ निर्माण केला आहे. यामुळे उत्तरेकडील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट येण्याची शक्यता आहे.
दरम्यान टॅपिनोमा मॅग्नम या प्रजातीच्या मुंग्या आक्रमक प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलेल्या नाहीत. सध्या स्थानिक परिसंस्थांकडे या मुंग्यांमुळेच परिणाम झाल्याचे पुरावे नाहीत. परंतु बाडेन-वुर्टेमबर्गचे पर्यावरण मंत्री आंद्रे बाउमन यांनी या मुंग्यांना धोकादायक म्हणून संबोधले आहे. या मुंग्यांवर वेळीच नियंत्रण न आणल्यास यामुळे मोठे नुकसान होण्याच्या शक्यतेचा इशारा बाउमन यांनी दिला आहे.
शास्त्रज्ञांनी संभाव्य धोक्याची जाणीव करुन दिली आहे. जर्मन शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय संस्था या मुंग्यांचा प्रसार थांबवण्यासाठी एकत्रितपणे कामकाज करत आहेत. यामुळे तांत्रिक संसाधांचे, पर्यावरणाचे आणि नागरिकांचे होणार नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की, या मुग्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. परंतु या मुंग्या किती आक्रमक आहेत याबाबत सध्या शोध सुरु आहे.